शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Satara: दागिन्याची पर्स एसटी बसच्या वरील कप्प्यात ठेवली, चोरट्याने लंपास केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 11:57 IST

नातीचा वाढदिवस साजरा करून पुण्यातून परतताना घडली घटना

कराड : एसटीमधून सुमारे साडेचार लाखांचे नऊ तोळे सोन्याचे दागिने व दहा हजार रुपये रोख रक्कम, असा ४ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केल्याची घटना पुणे-कुरुंदवाड एसटीमध्ये शुक्रवार, दि. २७ रोजी ही घटना घडली. याप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, सुवर्णा कृष्णा सावंत या आपल्या नातीच्या वाढदिवसासाठी पुणे येथे मुलाकडे गेल्या होत्या. वाढदिवस साजरा करून परत येत असताना पुणे येथे त्या पतीसोबत मुंबई-कुरुंदवाड एसटीमध्ये शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास बसल्या. यावेळी त्यांच्याबरोबर असलेल्या पर्समध्ये नऊ तोळे सोन्याचे दागिने व दहा हजार रुपये रक्कम होती.प्रवासामध्ये त्यांना काही अंतर गेल्यानंतर झोप येऊ लागली. त्यामुळे त्यांनी आपल्या जवळील सोन्याचे दागिने रोख रक्कम असलेली पर्स पतीजवळ दिली. पतीने ती पर्स एसटी बसच्या वरील कप्प्यात ठेवली. त्यानंतर त्यांनी कराड येथे कोल्हापूर नाक्यावर आल्यानंतर पाण्याची बाटली घेण्यासाठी पर्समध्ये पैसे शोधले असता ते आढळून आले नाहीत. तसेच ठेवलेले सोन्याचे दागिने रोख रक्कमही मिळून आली नाही.त्यांनी याबाबत एसटीचे चालक व वाहक यांना सांगून एसटीमध्ये शोध घेतला असता दागिने व रोख रक्कम मिळून आले नाही. त्यानंतर त्यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, अधिक तपास पोलिस करीत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Jewelry stolen from bus overhead compartment, police investigate.

Web Summary : A woman's jewelry and cash, worth ₹4.65 lakhs, were stolen from an overhead compartment on a Pune-Kurundwad bus. The incident occurred on Friday. Police in Karad have registered a case and are investigating the theft after the woman discovered the loss upon arrival.