कराड : कासारशिरंबे (ता. कराड) येथे कासारशिरंबे-बेलवडे रस्त्यावर वनविभागाचे पथक मंगळवारी पहाटे रात्र गस्त घालत होते. त्यावेळी पहाटे ५ वाजताच्या दरम्यान वन्यप्राणी रानडुकराची अवैध तस्करी करणारे ९ संशयित आरोपी ताब्यात घेण्यात आले. माहिती मिळाल्यानंतर, वनकर्मचाऱ्यांनी वाहन (एमएच. १०, डीटी. ६६९६) तपासले असता, गाडीमध्ये जिवंत ७ रानडुक्कर, शिकारी साहित्य, वाघर, गॅस साहित्य आणि ३ शिकारी पाळीव कुत्री आढळून आली.सोमनाथ बबन आडके, अमोल मारुती माने, सचिन हणमंत क्षीरसागर, सागर तानाजी यलमारे, अमित संजय आडके( सर्व रा. कासारशिरंबे, ता. कराड), गणेश नामदेव नंदीवाले (रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ), योगेश रघुनाथ कुंभार ( रा. मानकापूर, ता. चिकोडी), अमोल गुंडाजी नंदीवाले( रा. कोथळे, ता. शिरोळ), दत्तात्रय धोंडिराम ढोणे (रा. पलूस, ता. पलूस) अशी वनविभागाकडून अटक केलेल्यांची नावे आहेत. चौकशीदरम्यान वन्यप्राणी रानडुक्कर मौजे राजेगाव व गव्हाणधडी, ता. माजलगाव, जि. बीड येथून आणल्याचे कबूल केले.अटक केलेल्या सर्व संशयितांना दि.११ नोव्हेंबर रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर उभे केले असता त्यांना ४ दिवसांची वनकोठडी सुनावली. हे प्रकरण वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम विविध कलमांतर्गत गुन्हा असून, आरोपींना ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा १ लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. रानडुक्कर शिकारीप्रकरणी केलेली कारवाई साताऱ्याचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.कारवाई करणाऱ्या पथकामध्ये सहायक वनसंरक्षक जयश्री जाधव, वनक्षेत्रपाल ललिता पाटील, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनपाल दिलीप कांबळे, आनंद जगताप, वनरक्षक दशरथ चिट्टे, अभिनंदन सावंत, कविता रासवे, अजय महाडिक, रोहित कुलकर्णी यांचा सहभाग होता. पुढील तपास ललिता पाटील करत आहेत.
Web Summary : Nine arrested near Karad for illegally transporting seven live wild boars. Forest officials seized hunting equipment and dogs. The suspects face imprisonment and fines under wildlife protection laws. Investigation ongoing.
Web Summary : कराड के पास सात जीवित जंगली सूअरों का अवैध परिवहन करते हुए नौ गिरफ्तार। वन अधिकारियों ने शिकार उपकरण और कुत्ते जब्त किए। वन्यजीव संरक्षण कानूनों के तहत संदिग्धों को कारावास और जुर्माना का सामना करना पड़ेगा। जांच जारी।