सातारा : सातारा जिल्ह्यातील एमबीबीएस, एमडी, एमएस या डॉक्टरांची संघटना असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सातारा अध्यक्षपदी डॉ. नीलेश थोरात यांची बहुमताने निवड झाली; तर उपाध्यक्षपदी डॉ. दीपक थोरात, सचिवपदी डॉ. शरद जगताप आणि खजिनदारपदी डॉ. सागर कठारिया यांची निवड झाली आहे.
संघटनेच्या पदाधिकारी निवडीनंतर बोलताना डॉ. नीलेश थोरात म्हणाले, ‘इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांच्या अधिकृत संघटनेच्या वतीने कोरोनाच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्व शासकीय रुग्णालयांत आपली सेवा दिली आहेच. सोबतच सातारा जिल्ह्यात नव्याने होऊ घातलेल्या मेडिकल कॉलेजकरिताही सर्व डॉक्टर्स सहकार्य करतील. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून रक्तदान शिबिर; सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरग्रस्तांना मदत तसेच मेडिकल असोसिएशनची बहुद्देशीय इमारत जिल्ह्यात सर्व कार्यासाठी कार्यरत आहे.
कोरोनाकाळात अनेक डॉक्टरांनी आपले दवाखाने, हॉस्पिटल कोरोना रुग्णांकरिता खुले केले; तसेच त्यांना लस, औषधे उपलब्ध करून दिली. येणाऱ्या काळात महास्पोर्ट्सच्या माध्यमातून जिल्ह्यातील खेळाडू घडविण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करणार आहोत. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नवीन पदाधिकाऱ्यांचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. (वा.प्र.)
आयकार्ड फोटो आहे..
०२नीलेश थोरात