शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

पुढील दोन दिवसांत वीस चारा छावण्या - : विजय शिवतारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:34 AM

‘माणमध्ये एक्कावन्नपैकी एकतीस चारा छावण्या सुरू आहेत. उर्वरित वीस चारा छावण्या दोन दिवसांत सुरू करणार आहे. पालकमंत्री म्हणून मी छावण्यांची जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहे. नियमांचा बागुलबुवा न करता छावण्या सुरू करा.

ठळक मुद्दे माणमधील छावण्यांची पाहणी; कॅमेरे लावणे महत्त्वाचे नसून जनावरे वाचविणे महत्त्वाचे

दहिवडी : ‘माणमध्ये एक्कावन्नपैकी एकतीस चारा छावण्या सुरू आहेत. उर्वरित वीस चारा छावण्या दोन दिवसांत सुरू करणार आहे. पालकमंत्री म्हणून मी छावण्यांची जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहे. नियमांचा बागुलबुवा न करता छावण्या सुरू करा. कॅमेरे लावणे महत्त्वाचे नसून जनावरे वाचविणे महत्त्वाचे आहे,’ असे प्रतिपादन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी केले.

पिंगळी बुद्र्रुक येथे माणदेशी मागासवर्गीय सूतगिरणीने सुरू केलेल्या चारा छावणीला पालकमंत्री विजय शिवतारे यांनी शुक्रवारी भेट दिली. यावेळी चारा छावणीची पाहणी करून पशुपालकांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी शुगर ग्रीडचे चेअरमन, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य रणजितसिंह देशमुख, राष्ट्रवादीचे नेते मनोज पोळ, ‘रासप’चे जिल्हाध्यक्ष मामू वीरकर, भाजपचे रणधीर जाधव, शिवसेनेचे अनिल सुभेदार, रासपचे बबन वीरकर, केशवराव वणवे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार, तहसीलदार बाई माने, गट विकास अधिकारी गोरख शेलार, गटविकास अधिकारी काळे उपस्थित होते.

शिवतारे म्हणाले, ‘जनावरांना प्रथम प्राधान्य द्या. इतर गोष्टींना दुय्यम. छावणी सुरू करणे शासनाची जबाबदारी आहे. जाचक अटी न ठेवता लवकर छावण्या कशा सुरू करता येतील, ते पाहावे. चार दिवसांत चारा छावणी सुरू करणार नाहीत, त्या चालकांची परवानगी काढून घेऊ. जे सध्या चारा छावणी चालवत आहेत, त्यांना ती चारा छावणी चालविण्यास परवानगी द्या. छावणी सुरू केल्याच्या पहिल्या दिवसापासूनच अनुदान देण्यात येईल.

जनावरांचा खर्च छावणी चालकांवर येणार नाही, याची काळजी घेण्यात येईल. पाणी भरणा केंद्रावरून छावणीतील जनावरांसाठी लागणारे पाणी देण्यात येईल. तसेच जिल्हाधिकारी यांनी आदेश दिल्यानंतर छावणी सुरू करण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांनी उशीर केल्यास नोटीस काढण्यात येईल. जिल्हा बँक, मोठ्या पतसंस्था, साखर कारखाने यांना छावणी चालवण्यासाठी प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.’अनिल सुभेदार, डॉ. संतोष गोडसे, पृथ्वीराज गोडसे, धर्मराज जगदाळे, राजुभाई मुलाणी, पांडुरंग खाडे, गोविंदराव शिंदे, धनाजी निंबाळकर, शिवाजी दबडे, तुषार ओंबासे उपस्थित होते.

शासनाने छावणी चालून दाखवावीयावेळी रासपचे मामुशेठ वीरकर यांनी जनावरांची चारा छावणी चालवण्यासाठी एका जनावराला रोज किमान ११९ रुपये खर्च येतो. त्यामुळे मिळणारे अनुदान कमी असून, १२० रुपये करावे किंवा शासनाने ९० रुपये प्रती जनावरांप्रमाणे अनुदानात छावणी चालवून दाखवावी, असे निदर्शनास आणून दिले.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरGovernmentसरकार