शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
8
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
9
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
10
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
11
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
12
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
13
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
14
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
15
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
16
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
17
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
18
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
19
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
20
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?

मॅरेथॉनमुळे कऱ्हाडची नवी ओळख

By admin | Updated: December 23, 2015 01:31 IST

अभिनव देशमुख : स्पर्धकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद; शेतकरी, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी धावले

कऱ्हाड : ‘सहकार, सामाजिक व शैक्षणिक विकासाचे प्रणेते सहकारमहर्षी दिवंगत जयवंतराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त कृष्णा रुग्णालय व वैद्यकीय संशोधन केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृष्णा मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पहिल्याच वर्षी कृष्णा मॅरेथॉनला स्पर्धकांकडून मिळालेला प्रतिसाद पाहता भविष्यात कृष्णा मॅरेथॉनमुळे कऱ्हाडची जागतिक पातळीवर क्रीडा क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण होईल,’ असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले.कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्या उपस्थितीत आणि डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते ध्वज दाखवून सकाळी ६ वाजता कृष्णा रुग्णालाच्या प्रांगणातून मॅरेथॉनला प्रारंभ झाला. कृष्णा परिवारातील कृष्णा अभिमत विद्यापीठ, कृष्णा बँक, कृष्णा फाउंडेशन, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट स्कूल, कृष्णा महाविद्यालय, शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ आदी विविध संस्थांचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक आणि हजारो विद्यार्थी मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभागी झाले होते. परुषांच्या १८ ते ४० वयोगटात शरद पवार, समीर शेख, विजय निकम यांनी; तर महिला गटात वर्षा बंडा, अनुराधा टकले व प्राजक्ता पवार यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच पुरुषांच्या ४१ वर्षांवरील गटात विश्वनाथ सोनावणे, संभाजी मदने, राजेंद्र गायकवाड यांनी; तर महिलांच्या गटात नीता शेवाळे, डॉ. मनीषा लद्दड व नंदा जाधव यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविला. दहा किलोमीटर अंतराच्या पुरूषांच्या १८ ते ४० वयोगटात विजय शिंंदे, मयूर कंक, दीपक देसाई यांनी; तर महिला गटात शैनी लोके, सुटिंग लिम व ऋजुता दुधे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच पुरुषांच्या ४१ वर्षांवरील गटात डॉ. प्रभाकर देसाई, चंद्रकांत पाटील, डॉ. मानसिंंग राजे; तर महिलांच्या गटात गौरी निलाखे, डॉ. यामिनी पाटील यांनी यश मिळविले. विजेत्यांना डॉ. अभिनव देशमुख, डॉ. सुरेश भोसले, पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, सोनाली लाड-देशमुख यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कृष्णा विद्यापीठाचे सहायक कुलसचिव एस. ए. माशाळकर व डॉ. संजय पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)