शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

माउलींच्या पादुकांचे नीरा स्नान, पालखी सोहळा लोणंदनगरीत विसावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 16:24 IST

वाल्हे मुक्कामानंतर सकाळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने नीरेकडे प्रस्थान केले. दुपारच्या न्याहारीनंतर सोहळ्याने सातारा जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी माउलींच्या पादुकांना नीरा दलघाटावर स्नान घालण्यात आले.

ठळक मुद्देमाउलींच्या पादुकांचे नीरा स्नानपालखी सोहळा लोणंदनगरीत विसावला

सातारा : वाल्हे मुक्कामानंतर सकाळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने नीरेकडे प्रस्थान केले. दुपारच्या न्याहारीनंतर सोहळ्याने सातारा जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी माउलींच्या पादुकांना नीरा दलघाटावर स्नान घालण्यात आले.माउलींच्या पादुकांना नीरा नदीवर स्नान घालण्याची ७०० वर्षांची परंपरा आहे. त्यानुसार दुपारी दीडच्या सुमारास माउलींची पालखी नीरा नदीवरील दत्त घाटावर आल्यानंतर अवघा दत्त घाट परिसर माउलींच्या जयघोषाने दुमदुमला. यावेळी हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती. हा सोहळा सुरू असताना वारकऱ्यांच्या आनंदाला उधाण आले होते. हरिनामाच्या जयघोषात आणि टाळ-मृदंगांच्या गजरात माउलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान करून संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचे आज दुपारी मोठ्या आनंदाने भक्तिमय वातावरणात सातारा जिल्ह्यात आगमन झाले.संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पाडेगाव (ता. खंडाळा) येथे सातारा जिल्ह्यात पालखी सोहळ्याने प्रवेश करताच सातारा जिल्ह्याच्या वतीने खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप वारके, आ. आनंदराव पाटील, जिजामाला नाईक-निंबाळकर, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, माजी आमदार मदन भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, कृषी सभापती मनोज पवार, जिल्हा परिषदेच्या सदस्या दीपाली साळुंखे, उदय कबुले, खंडाळा पंचायत समितीचे सभापती मकरंद मोटे, उपसभापती वंदनाताई धायगुडे, सदस्य राजेंद्र तांबे, अश्विनी पवार, चंद्रकांत यादव, शोभा जाधव, प्रांत संगीता चौगुले, तहसीलदार दशरथ काळे, नरेंद्र पाटील, पोडगावच्या सरपंच हरिश्चंद्र माने, उपसरपंच विजय धायगुडे, सरपंच स्मिता स्वरात यांनी माउलींच्या पालखीचे स्वागत केले.नीरा नदीतील स्नानाने ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. पाडेगाव येथे लाखो भाविकांनी माउलींचे दर्शन घेतले. फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ-मृदंगांचा गजर आणि हरिनामात, हरिभजनात तल्लीन होऊन वारकरी नाचत होते. भाविकांच्या प्रचंड उत्साहाने माउलींचा पालखी सोहळा भक्तरसात चिंब होऊन गेला होता. विठ्ठल नामाचा जयघोष करीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मंगळवारी सातारा जिल्ह्यात भव्य स्वागत करण्यात आले. नीरा नदीपात्रात माउलींच्या पादुकांना स्नान घातल्यानंतर दुपारी चार वाजता पालखी सोहळा लोणंदनगरीत विसावला.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीSatara areaसातारा परिसर