राष्ट्रवादीच्या सत्तेची गणिते सेना-भाजपवर अवलंबून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 12:22 AM2017-09-11T00:22:17+5:302017-09-11T00:22:17+5:30

NCP's power calculations depend on army and BJP! | राष्ट्रवादीच्या सत्तेची गणिते सेना-भाजपवर अवलंबून!

राष्ट्रवादीच्या सत्तेची गणिते सेना-भाजपवर अवलंबून!

googlenewsNext



लोकमत न्यूज नेटवर्क
मेढा : जावळी तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींची निवडणूक आॅक्टोबर महिन्यात होत आहे. या निवडणुकीत सेना-भाजपची युती होणार की वेगवेगळे लढणार यावरच राष्ट्रवादीच्या सत्तेची गणिते मांडली जाणार आहेत. सध्या वर्चस्व असलेली राष्ट्रवादी ही सेना-भाजपची रणनिती भेदून आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
जावळी तालुक्यातील बहुतेक ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. काही ठिकाणी गटातटाची सत्ता असली तरीही राष्ट्रवादीच खºयाअर्थाने सत्तेवर आहे. तसेच तालुक्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे यांचे वर्चस्व अबाधित आहे. शिवसेना तालुक्यातील प्रत्येक गावात आहे. मात्र, कणखर नेतृत्वाचा अभाव असल्याने या निवडणुकीत सेना तह करणार की शह देणार यावरच बरेचसे अवलंबून राहणार आहे.
तालुक्यात १५ ग्रामपंचायतींपैकी बहुतांशी ग्रामपंचायती या कुडाळ भागातील असून, यामध्ये करहर, आखाडे, मोरघर, वालूथ, सोमर्डी या राजकीयदृष्ट्या संवेदनशील गावांचा समावेश आहे. मेढा विभागातील रिटकवली, कुसुंबी, ओझरे, केळघर या प्रमुख गावांमधील निवडणूक अटीतटीची होणार की बिनविरोध याबाबत मात्र साशंकता आहे.
केळघर, कुसुंबी, रामवाडी, रुईघर, सोमर्डी, वालूथ, मोरघर, शिंदेवाडी, वाकी, आखाडे, भोगावली तर्फ कुडाळ, रिटकवली, करहर, ओझरे या गावांमध्ये प्रथमच थेट सरपंच निवड होणार आहे. कुडाळ भागात राष्ट्रवादीचे व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, भाजपचे जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रशांत तरडे यांच्या भूमिका महत्त्वाच्या ठरणार आहेत. कुडाळ भागात राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना या पक्षांची
ताकद आहे.

Web Title: NCP's power calculations depend on army and BJP!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.