शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचा ‘जायंट किलर’ आक्रमक

By admin | Updated: November 20, 2014 00:01 IST

पक्षाची पुनर्बांधणी : शशिकांत शिंदेंच्या रुद्रावताराने कोरेगावातील अनेकांना फुटला घाम

कोरेगाव : कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा विक्रमी विजय संपादन करत पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा ‘जायंट किलर’ ठरलेल्या आमदार शशिकांत शिंंदे यांनी निवडणुकीनंतर पहिल्यांदाच खुले भाष्य करून निवडणुकीत गद्दारी करणाऱ्यांना सज्जड दम भरला आहे. मंत्रिपदामुळे गेले दीड वर्ष तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करणाऱ्या आ. शिंंदे यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत नव्याने पक्षबांधणी करण्याचा निर्णय जाहीर केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून कोरेगाव तालुक्यात आणि मतदारसंघात कार्यकर्त्यांचे प्रचंड मोहोळ आहे. सक्षम पदाधिकारी आणि गाव-वाडीवस्तीवर पक्षाचा कार्यकर्ता ही राष्ट्रवादीची भक्कम बाजू आहे. अपवाद वगळता सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकत राहिला आहे. डॉ. शालिनीताई पाटील यांच्या आमदारकीच्या दोन्ही टर्मच्या वेळी कारखाना गट आणि राष्ट्रवादी असे वेगवेगळे प्रवाह होते. पुढे तार्इंना पक्षाने बाहेरचा रस्ता दाखविल्यानंतर त्यांचा गट काँग्रेसच्या संपर्कात गेला आणि राष्ट्रवादीच्या गटाने पक्षसंघटना ताब्यात घेत तालुक्यावर वर्चस्व कायम ठेवले. २००९ मध्ये जावली मतदारसंघ रद्द झाल्याने तेथील आमदार शशिकांत शिंंदे यांना कोरेगावातून राष्ट्रवादीने संधी दिली. अत्यंत कमी कालावधीत त्यांनी मतदारसंघ पिंंजून काढून यश मिळवले. विजयी झाल्यानंतर त्यांनी पक्षसंघटना बळकट करण्यास सुरुवात केली. प्रत्येक सक्षम कार्यकर्त्यास कुवतीप्रमाणे योग्य पदावर संधी दिली. काहींना राज्यपातळीवर काम करण्यास मिळाले. ग्रामपंचायत निवडणुकीतदेखील लक्ष घालत त्यांनी पक्षाला यश मिळवून दिले; मात्र त्याच काळात अनेकजण दुखावले गेले आणि काहींनी पक्षाशी काडीमोड घेतला. सुरुवातीला काहीसा त्याचा परिणाम जाणवला नाही; मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत त्याचा फटका आ. शिंंदे यांना बसला. जिल्हा परिषदेत केवळ दोन तर पंचायत समितीत सात सदस्य निवडून आले. काही ठिकाणी दगाफटका झाल्याने राष्ट्रवादीनेच राष्ट्रवादीचा पराभव केल्याचे प्रकर्षाने जाणवले. त्यानंतर मिळालेल्या वेळेचा योग्य वापर करण्यास आ. शिंंदे यांनी सुरुवात केली; मात्र अनपेक्षितरीत्या कॅबिनेट मंत्रिपद आणि जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची संधी मिळाल्यानंतर शिंंदे यांचे मतदारसंघात लक्ष कमी झाले. सततच्या मुंबईवाऱ्या आणि जिल्ह्याच्या जबाबदारीमुळे इच्छा असूनही त्यांना मतदारसंघात पक्षबांधणी करता आली नाही.विधानसभा निवडणुकीवेळी कोणताही दगाफटका होऊ नये याची पुरेपूर खबरदारी शिंंदे यांनी घेतली होती. त्यांनी आपली हक्काची यंत्रणा जवळ ठेवलीच; त्याचबरोबर प्रमुख पदाधिकाऱ्यांवर जिल्हा परिषद गटाची स्वतंत्र जबाबदारी सोपविल्याने त्यांना निवडणुकीत चांगले मताधिक्य घेऊन यश मिळवता आले. मात्र काही ठिकाणी अपेक्षा नसताना दगाफटका झाला आणि पक्षाला कमी मते मिळाली. राज्यातील प्रमुख विजयी उमेदवारांमध्ये आपला समावेश राहावा यासाठी शिंंदे यांनी मनापासून प्रयत्न केले; मात्र पक्षातीलच काही लोकांनी साथ सोडल्याने मताधिक्यात घट झाली. गावोगावच्या आणि वॉर्डनिहाय मतांची आकडेवारी समोर आल्यानंतर पक्षाला खरा आरसा दिसला. त्यातून सुरु झाली दुरुस्ती मोहीम. पक्षात राहून आणि व्यासपीठावर योग्य पोझिशन मिळवायची आणि निवडणुकीत आपला करिष्मा दाखवायचा, असे काही कार्यकर्त्यांचे तंत्र उघडे पडल्याने आता त्यांचा ‘हिशेब’ करण्याची वेळ आल्याचे आ. शिंंदे यांना वाटते. सततच्या जनसंपर्कामुळे सामान्य लोकांनी ही निवडणूक हातात घेतली होती. काही ठिकाणी उलट्या बेरजा झाल्या असल्या, तरी त्यामुळे आपला कोण हे आपण ओळखले असल्याने यापुढे चुकलेल्यांना माफ न करण्याचे धोरण ठेवणार असल्याचे त्यांचे विधान सूचक आहे. (प्रतिनिधी)कार्यकर्त्यांचे धाबे दणाणले‘पंचायत समितीत पूर्वीप्रमाणेच दर पंधरा दिवसांनी जनता दरबार घेण्याची प्रथा सुरू ठेवणार आहे. मी मोठ्या मनाने सर्वांना जवळ करतो; परंतु पाठीत खंजीर खुपसण्याचे काम यापुढे कोणी करू नये. विधानसभेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी राखलेले ऐक्य व एकजूट आगामी काळातील सर्वच निवडणुकांमध्ये कायम ठेवावी. राज्यात सत्ता नसली, तरी तालुक्यातील सत्ता अबाधित ठेवण्यासाठी नव्याने पक्षबांधणी करू,’ अशी डरकाळी आ. शिंंदे यांनी कोरेगावच्या सत्कार सोहळ्यात फोडल्याने कार्यकर्त्यांचे धाबे दणाणले आहेत.