शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

नोटाबंदीविरोधात जिल्ह्यात राष्ट्रवादी आक्रमक

By admin | Updated: January 9, 2017 22:45 IST

राष्ट्रीय महामार्गावर : लोकप्रतिनिधींचा एल्गार

सातारा : व्यवहारातून पाचशे व हजार रुपयांच्या नोटाबंदी केल्यानंतर दोन महिने झाले. तरीही सर्वसामान्यांचे हाल थांबलेले नाही. या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने केली. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक यानिमित्ताने रस्त्यावर उतरले होते. अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठिकठिकाणी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. ंनोटाबंदीच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादीतर्फे साताऱ्यात सोमवारी मोर्चा काढण्यात आला. महामार्गावर रास्ता रोको करत असताना राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते यांची पोलिसांशी जोरदार झटापट झाली. पोलिसांनी विरोध करूनही वाढे फाटा येथे कार्यकर्त्यांनी महामार्गावर ठिय्या मारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी जाहीर करून ५० दिवस झाले तरीही सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत आहे. याच्या निषेधार्थ सोमवारी दुपारी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आ. शशिकांत शिंदे, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी भवन ते वाढेफाटा असा बैलगाडीतून मोर्चा काढून महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. साताऱ्यात राष्ट्रवादी भवन ते वाढे फाटा असा बैलगाडीतून मोर्चा काढण्यात आला. यावेळी सातारा व जावळी तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. पोलिस प्रशासनाने जरंडेश्वर नाका परिसरात मोर्चा आडवला. यावेळी मोर्चास संबोधित करताना आ. शशिकांत शिंदे म्हणाले, ‘लोकशाहीत निषेध नोंदवला तरी हुकूमशाही व हिटलरशाही प्रमाणाने विरोधकांना वागणूक देत आहेत. नोटाबंदीच्या निर्णयामुळे काळापैसा बाहेर न काढता काळ्या पैशाचे पांढऱ्या पैशात रुपांतर करण्याचा सरकारचा डाव होता. नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस सरकार विरोधकांची मुस्कटदाबी करत आहेत. त्यांनी घेतलेल्या निर्णयाविरोधात आवाज उठविणाऱ्यांना अटक व त्यांची चौकशी केले जाते.’ आ. शिवेंद्रराजे म्हणाले, ‘ग्रामीण भागातील शेतकरी वर्गास सहकारी बँकांकडून उद्योगपतींच्या खासगी बँकांकडे वळवण्याचा त्यांचा डाव आहे. त्यांच्या नोटाबंदीमुळे बाजारपेठा ठप्प आहे. उद्योग-धंदे बंद पडत आहे आणि सर्वसामान्य शेतकरी कर्जबाजारी होत आहे. त्याच्या निषेधार्थ आंदोलन केले जात आहे. नोटाबंदीच्या निर्णयात सहकारी बँकावर निर्बंध घालून सहकारी चळवळ मोडीत काढण्याचे सरकारचे धोरण होते. त्याचबरोबर देशात आदर्श अशा सातारा जिल्हा बँकेची चार वेळा चौकशी केली.’ अजूनही बँकांमध्ये गर्दी, एटीएम सेंटरमध्ये गर्दी असून, याची झळ सर्वसामान्यांना बसत आहे. त्यानंतर मोर्चा महामार्गाकडे वळला. पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी काहीवेळ महामार्ग रोखून धरला. त्यानंतर पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले. यामध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सुनील माने, नितीन भोसले, जिल्हा परिषद सदस्य किरण साबळे-पाटील, राजू भोसले, सतीश चव्हाण, पंचायत समिती सदस्य राहुल शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)तालुकानिहाय लोकप्रतिनिधींवर जबाबदारीराष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी राज्यभरात आंदोलनची हाक दिली. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आंदोलन करण्याचे आदेश दिले आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व आ. शशिकांत शिंदे यांनी आंदोलनाची जबाबदारी प्रत्येक तालुक्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींवर असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार सोमवारी जिल्ह्यात राष्ट्रवादीतर्फे सर्व तालुक्यांमध्ये रास्ता रोको, निदर्र्शने व मोर्चे काढण्यात आले. या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली.