शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

‘एनसीइआरटी'ने दहावी अभ्यासक्रमातून उत्क्रांतीचा विज्ञान सांगणारा भाग वगळला, अंनिस राबवणार प्रबोधन अभियान

By नितीन काळेल | Updated: May 3, 2023 19:30 IST

सातारा : ‘एनसीइआरटीने दहावी अभ्यासक्रमातून उत्क्रांतीचा विज्ञान सांगणारा भाग वगळला आहे. त्यामुळे महाराष्ट्र ‘अंनिस’ याचा निषेध करत आहे. त्याचबरोबर ...

सातारा : ‘एनसीइआरटीने दहावी अभ्यासक्रमातून उत्क्रांतीचा विज्ञान सांगणारा भाग वगळला आहे. त्यामुळे महाराष्ट्र ‘अंनिस’ याचा निषेध करत आहे. त्याचबरोबर याचा निषेध कृतीतून व्यक्त करण्यासाठी ‘अंनिस’ ‘चला उत्क्रांती समजून घेऊया’ हे अभियान राबविणार आहे,’ अशी माहिती डाॅ. हमीद दाभोलकर यांनी दिली.याबाबत महाराष्ट्र ‘अंनिस’च्या वतीने डाॅ. हमीद दाभोलकर, प्रशांत पोतदार आणि वंदना माने यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.यामध्ये म्हटले आहे की, एनसीइआरटीने दहावीच्या अभ्यासक्रमातून उक्रांतीचा विज्ञान सांगणारा भाग वगळल्याची माहिती समोर आली आहे. अनुवांशिकता आणि उत्क्रांती विषयी दहावीच्या अभ्यासक्रमात असलेला भाग वगळून त्याजागी केवळ अनुवांशिकता एवढाच भाग ठेवलेला आहे. अभ्यासक्रमातून उत्क्रांतीचे विज्ञान वगळण्याचा अंनिस निषेध करत आहे. कारण, पृथ्वीवर जीवसृष्टीची उत्पती कशी झाली याची शास्त्रीय मांडणी उत्क्रांतीच्या सिद्धांताद्वारे केली जाते.टप्प्याटप्प्याने एक पेशीय प्राणी त्यानंतर बहुपेशीय प्राणी, मानवाचे आधीच्या टप्प्यावरील माकड आणि सर्वात शेवटी मानव अशा टप्प्यांमधून मानवी उत्क्रांती कशी झाली यांची शास्त्रीय माहिती यामध्ये दिली जाते. पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण होण्यामागे कोणतीही विशिष्ट शक्ती नाही. उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून ती झाली आहे. ही माहिती शालेय वयातील मुलांना पहिल्यांदा उत्क्रांतीच्या सिद्धांतातून मिळते.

मानवी जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या अनेक अंधश्रद्धाची निर्मिती ही मानवी जीवनाचा उगम कसा झाला याची योग्य माहिती नसल्याने होतो. त्यामुळे उत्क्रांतीचा सिद्धांत शालेय अभ्यासक्रमातून शिकवल्याने विद्यार्थ्यांची मानवी जीवनाच्या उत्पत्तीमागे असलेल्या विज्ञानवादी भूमिकेशी तोंड ओळख होते. प्रत्यक्षात सहावी, सातवीच्या विद्यार्थ्याला याविषयी प्रश्न पडू लागतात. त्यामुळे तेव्हापासून टप्प्याटप्प्याने याविषयी माहिती शालेय अभ्यासक्रमातून येणे आवश्यक आहे. उत्क्रांतीचा सिद्धांत शालेय पुस्तकांमधून वगळल्यामुळे मुलांमध्ये विज्ञानवादी मानसिकता निर्माण होण्यात अडथळा निर्माण होणार आहे.भारतातील आणि परदेशातील अनेक विद्यापीठांमध्ये उत्क्रांती सिद्धांत जीव शास्त्रातील मुलभूत सिद्धांत म्हणून शिकवला जातो. उत्क्रांतीविषयी विशेष कोर्सही शिकवले जातात. या पार्श्वभूमीवर उत्क्रांतीचा सिद्धांत दहावीच्या अभ्यासक्रमातून वगळल्यामुळे दहावीनंतर विज्ञान शाखा घेणार नाहीत. त्या विद्याऱ्थांना उत्क्रांतीच्या सिद्धांताची माहिती मिळणार नाही. देशभरतील १८०० वैज्ञानिकांनी या गोष्टीला विरोध नोंदवला आहे. त्याला महाराष्ट्र अंनिस पाठींबा देत आहे, असेही या पत्रकात स्पष्ट केले आहे. या पत्रकावर अंनिस पदाधिकारी भगवान रणदिवे, डॉ. दीपक माने, हौसेराव धुमाळ, शंकर कणसे,, विलास भांदिर्गे, कुमार मंडपे आणि प्रमोदिनी मंडपे यांच्या सह्या आहेत.

चला उत्क्रांती समजून घेऊया अभियानातील मुद्दे...

  • उत्क्रांती विषयावर शालेय मुलांसाठी पुस्तिका प्रकाशन
  • विज्ञान शिक्षकांसाठी उत्क्रांती विषयावर कार्यशाळा
  • एनसीइआरटीला उत्क्रांती विषय शिक्षणात समाविष्ट करण्यासाठी पत्र लिहिण्याची मोहीम
  • महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात उत्क्रांती विषयावर मांडणी करणाऱ्या प्रशिक्षित वक्त्यांचे नेटवर्क उभे करणे
टॅग्स :Satara areaसातारा परिसर