शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

नवजा ३२४ तर महाबळेश्वरला २०३ मिलीमीटर पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 19:22 IST

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून रविवारी सकाळपर्यंत नवजाला ३२४, महाबळेश्वर २०३ आणि कोयनानगरमध्ये १८२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

ठळक मुद्देनवजा ३२४ तर महाबळेश्वरला २०३ मिलीमीटर पाऊसकोयनेच्या विसर्गात वाढ : पाणीसाठा ९१ टीएमसीजवळ; दरवाजे ६ फुटांवर
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून रविवारी सकाळपर्यंत नवजाला ३२४, महाबळेश्वर २०३ आणि कोयनानगरमध्ये १८२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.सततच्या पावसामुळे कोयना धरणातील साठ्यात वाढ झाली. त्यामुळे सकाळी ११ च्या सुमारास पाणीसाठा ९०.८९ टीएमसी झाला होता. तर विसर्ग वाढवून तो ३५७३२ क्यूसेकवर पोहोचला होता. ६ दरवाजे ६ फुटांपर्यंत उघडण्यात आले होते. रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १८२ तर जूनपासून आतापर्यंत ३३१५ मिलिमीटर पाऊस झाला. तर महाबळेश्वरला २०३ आणि आतापर्यंत ३६९४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर नवजाला सकाळपर्यंत सर्वाधिक ३२४ आणि आतापर्यंत ३७५९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. सकाळी ११ च्या सुमारास कोयना धरणात ५९२६१ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. तर धरणाचे ६ दरवाजे ६ फुटांनी उचलण्यात आले होते. या दरवाजातून ३३६३२ क्यूसेक पाणी सोडण्यात येत होते. त्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली. परिणामी कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर कोयना धरणात २४ तासांतजवळपास ५ टीएमसीने वाढ झाली आहे. दरम्यान, रविवारी सातारा शहर व परिसरात पावसाची उघडझाप सुरू होती. सकाळच्या सुमारास पाऊस झाला. त्यानंतर ढगाळ वातावरण तयार झाले.
टॅग्स :Satara areaसातारा परिसरDamधरण