शहरं
Join us  
Trending Stories
1
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
2
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
3
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
4
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
5
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
6
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
7
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
8
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
9
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
10
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
11
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
12
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
14
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
15
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
16
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
17
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
18
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
19
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
20
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video

नवजा, महाबळेश्वरला धुवांधार पाऊस; गतवर्षीपेक्षा अधिक;  कोयना धरण पाणीसाठ्यात १० दिवसांत ३६ टीएमसी वाढ

By नितीन काळेल | Updated: July 26, 2023 12:41 IST

यंदा उशिरा पाऊस सक्रिय होऊनही पश्चिमेकडे मागील वर्षीपेक्षा अधिक पाऊस

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात उशिरा पाऊस सुरू होऊनही गतवर्षीच्या तुलनेत अधिक पडलेला आहे. नवजा, महाबळेश्वरच्या पावसाने तर यंदा लवकरच तीन हजार मिलीमीटरचाही टप्पा पार केला आहे. यामुळे धरणेही भरु लागल्याने चिंता कमी होऊ लागली आहे. तर कोयना धरणातील पाणीसाठ्यात अवघ्या १० दिवसांत ३६ टीएमसीने वाढ झाली आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागातील पाटण, महाबळेश्वर तालुक्यात दरवर्षी पाच हजार मिलीमीटरहून अधिक पर्जन्यमानाची नोंद होते. यातील काेयना, नवजा, पाथरपूंज आणि महाबळेश्वर हा तर अतिवृष्टीचा भाग समजला जातो. या भागात मान्सून दाखल झाल्यापासून सतत पाऊस पडत असतो. त्यामुळे कमी दिवसांतही येथे अधिक पाऊस होतो. यावर्षी तर मान्सूनचा पाऊस उशिरा सक्रीय झाला. १५ दिवस उशिरा आलेल्या या पावसाने आतापर्यंत मागीलवर्षीची बरोबरी केली आहे. त्यातच सध्याही धो-धो पाऊस पडत असल्याने प्रमुख धरणातील पाणीसाठ्यातही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.पश्चिम भागातील कोयनानगर येथे गतवर्षी २६ जुलैपर्यंत २२३० मिलीमीटर पाऊस पडला होता. तर नवजा येथे २८४६ आणि महाबळेश्वरला २९८२ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली. पण, यावर्षी आतापर्यंत एक महिन्याच्या काळातच येथील पाऊस गतवर्षीची बरोबरी करुन पुढे गेलेला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोयनानगरला २३४० तर नवजा येथे ३२७४ आणि महाबळेश्वरला ३१०३ मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. यंदा उशिरा पाऊस सक्रिय होऊनही पश्चिमेकडे मागीलवर्षीपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. त्यातच आणखीही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे यंदा गतवर्षीपेक्षा अधिक पर्जन्यमान होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

कोयना धरणात ६१ टीएमसीवर पाणीसाठा...कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. या धरणात बुधवारी सकाळच्या सुमारास ६१.३० टीएमसी पाणीसाठा झाला होता. तर धरणात ५७ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. १६ जुलैपासून धरणात ३६.४० टीएमसी पाणीसाठा वाढलेला आहे. तर १० दिवसांत कोयनेला १३३१, नवजा येथे १८४८ आणि महाबळेश्वरला १६३० मिलीमीटर पाऊस झाला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान