शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
4
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
5
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
6
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
7
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
8
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
9
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
10
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
11
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
12
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
13
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
14
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
15
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
16
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
17
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
18
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
19
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
20
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर

सुर्ली घाटात निसर्गाला बहर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 15:16 IST

हिरव्या वनराईने नटलेले डोंगर, स्वच्छ खळखळते झरे, खोल खोल दºया, पारदर्शक पाण्याचे तळे व मस्त झोंबणारा थंडगार वारा असा सगळा मन प्रसन्न करणारा परिसर सुर्ली घाटात आहे. याचा आनंद लुटण्यासाठी पर्यकांचा ओढा वाढत आहे. तरूणाईची पहली पसंती या घाटातील पर्यटनला मिळत असल्याने या परिसरात पर्यटन वाढत असल्याचे दिसते.

ठळक मुद्देघाटातील पर्यटनला तरूणाईची पहली पसंती गर्द वनराई, झरे, दºया ठरतायत आकर्षणटेहळणी मनोºयाची आवश्यकता

ओगलेवाडी (जि. सातारा)21 : हिरव्या वनराईने नटलेले डोंगर, स्वच्छ खळखळते झरे, खोल खोल दºया, पारदर्शक पाण्याचे तळे व मस्त झोंबणारा थंडगार वारा असा सगळा मन प्रसन्न करणारा परिसर सुर्ली घाटात आहे. याचा आनंद लुटण्यासाठी पर्यकांचा ओढा वाढत आहे. तरूणाईची पहली पसंती या घाटातील पर्यटनला मिळत असल्याने या परिसरात पर्यटन वाढत असल्याचे दिसते.  

कºहाड आणि कडेगाव तालुक्याच्या हद्दीवर सुर्ली घाट आहे. तिव्र उतार आणि वेडीवाकडी वळणे या घाटात आहेत. निसर्गाने या परिसराला भरभरून दिले आहे. मुक्तहस्ताने निसर्गाने केलेली उधळण पाहण्यासाठी येथे येणाºया पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे निसर्गाबरोबरच पर्यटनालाही बहर आल्याची सद्या येथे परिस्थिती आहे.

सद्या पावसाळा सुरू असून निसर्गाला सर्वत्र बहर आला आहे. हे निसर्ग सौंदर्य डोळ्यात साठवण्यासाठी अनेकजण पावसाळ्यात पर्यटन करतात. अनेक किलोमीटर प्रवास करून निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी आजकालची तरूणाई प्रयत्नशील असते. अशा तरूणाईसाठी आता एक नवीन आणी जवळचे ठिकाण साद घालीत आहे. ते ठिकाण म्हणजे सुर्ली घाट परिसर. हिरवळीने नटलेला हा परिसर तरूणाईचा आवडता स्पॉट बनला आहे.

कºहाडपासून पूर्वेला १५ किलोमिटर अंतरावर हा घाट आहे. हिरव्यागार वनराईने झाकलेले डोंगर, खळखळते झरे, स्वच्छ पाण्याचे तळे, जानाई देवीचे सुंदर मंदीर आणि थंडगार वारा असा सगळा पर्यटनाचा मसाला व घाट माथ्यावर खवय्यांसाठी सोय यामुळे हा परिसर सर्वांचे आकर्षण ठरत आहे. महाविद्यालयीन तरूणांसाठी हा परिसर आवडीचा स्पॉट बनला आहे. या परिसरात सेल्फीसाठी अनेक जागा असल्याने सेल्फी प्रेमींसाठी हा घाट पर्वणीच आहे.टेहळणी मनोºयाची आवश्यकता

सुर्ली घाट परिसरातून खूप दूरवरचा प्रदेश सहज पाहता येतो. येथील टेकडीवरून कºहाड परिसराचे विहंगमदृष्य नजरेत भरते. याच टेकडीवर एखादा निरीक्षण मनोरा उभारल्यास आणखी दूरवरचा प्रदेश आणि कृष्णा नदीचा प्रवाह न्याहाळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.