शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha 2019 : राष्ट्रवादी अन् काँग्रेस हे बरबटलेले पक्ष : प्रमोद सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 15:39 IST

केंद्र व राज्यातील सरकार हे आरोप असलेले सरकार आहे तर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी हे पक्ष आरोपांनी बरबटलेले आहेत. अशांना लोक परत लोक निवडून देणार नाहीत, असे प्रतिपादन गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.

ठळक मुद्देराष्ट्रवादी अन् काँग्रेस हे बरबटलेले पक्ष : प्रमोद सावंतभाजपकडून अंत्योदय तत्त्वावरील राजकारण

कऱ्हाड : केंद्र व राज्यातील सरकार हे आरोप असलेले सरकार आहे तर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी हे पक्ष आरोपांनी बरबटलेले आहेत. अशांना लोक परत लोक निवडून देणार नाहीत. कारण लोकांनी त्यांचे पंधरा ते वीस वर्षांचे राजकारण बघितले आहे. याउलट भारतीय जनता पक्षाचे राजकारण अंत्योदय तत्त्वावर चालणार आहे. आरोग्यासह इतर कारणांसाठी काढलेल्या सर्व योजना सर्व सामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजप सरकार कार्य करत आहे, असे प्रतिपादन गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.कऱ्हाड येथील वेणूताई चव्हाण स्मारक भवनमध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा कॉफी विथ युवा संवाद हा कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. यानंतर मुख्यमंत्री सावंत यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे उपस्थित होत्या.प्रमोद सावंत म्हणाले, ह्यआर्थिक मंदी फक्त भारतात नसून ती सबंध जगभर आहे. याचाही विचार सर्वांनीच केला पाहिजे. जीएसटीमध्येही बदल केले गेले आहेत. पंतप्रधान तसेच अर्थमंत्र्यांकडून घेतल्या गेलेल्या विविध निर्णयाचा फायदा अर्थनीतीमध्ये देशाला व राज्याला होणार आहे. औद्योगिकीकरण होणे हे अत्यंत गरजेचं आहे. आपल्या देशात विकासाची अनेक साधने आहेत. त्याच्यावर लक्ष देणे गरजेचे आहे.

राफेल विमानाबाबत विरोधकांकडून अनेकवेळा आरोप केले गेलेत. सुरुवातीला खरेदीवरून आता पूजनवरून केले जात आहेत. दसऱ्याच्या दिवशी प्रत्येक जण हा आपापल्या घरी शस्त्रपूजन करत असतो. राफेल विमानाचं पूजन केलं म्हणून काय बिघडलं?

आज महाविद्यालयीन तरुण युवकांना विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी मिळवून देण्याचं काम खऱ्या अर्थाने भाजप करीत आहे. भाजपाने तरुणांवर खूप मोठा विश्वास टाकला आहे. लवकरच तरुणांच्या मदतीने देश एक आर्थिक महासत्ता बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

टॅग्स :BJPभाजपाSatara areaसातारा परिसर