शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Brinda Karat: एकात्मता धुळीस मिळविण्याचा मोदींचा डाव, वृंदा करातांचा केंद्र सरकारवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 17:42 IST

देशात महागाई वाढली आहे, परंतु पंतप्रधान मोदी व त्यांच्या समर्थकांना त्याची काळजी नाही, तर त्यांना हनुमान चालिसा वाचण्याची काळजी आहे.

सातारा : देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये जी राष्ट्रीय एकात्मता व भाईचारा होता, तो धुळीस मिळविण्याचा कार्यक्रम केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या सरकारने हाती घेतला आहे. याच्याविरोधात आता सर्वांनीच एल्गार पुकारला पाहिजे, असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या माजी खासदार वृंदा करात यांनी सातारा येथील गांधी मैदानावरील जाहीर सभेत बोलताना केले.ऐतिहासिक सातारा शहरातील महात्मा गांधी मैदानावर काल, शुक्रवारी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कमिटीच्यावतीने ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी जनवादीच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा कॉम्रेड नसीमा शेख होत्या.यावेळी विचार मंचावर ज्येष्ठ नेत्या कॉ. अंजलीताई महाबळेश्वरकर,  स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. अशोक भोईटे, उदय नारकर, कॉ. सुधा सुंदरामन, शुभा शमीम, प्राची हातिवलेकर, मरियम ढवळे, किरण माने, माणिक अवघडे, आनंदी अवघडे आदी उपस्थित होते. यावेळी सातारकर उपस्थित होते.करात म्हणाल्या, भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास बदलण्याचे काम करीत आहेत, हे आपल्याला जनतेपुढे आणायचे आहे. जो एकात्मतेचा विचार घेऊन स्वातंत्र्य चळवळीत स्वातंत्र्य सैनिकांनी हौतात्म्य पत्करले, ते हौतात्म्य आम्ही वाया जाऊ देणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.स्वातंत्र्ययुद्ध सुरू होते, तेव्हा मोदीजी यांच्या विचारांचे अनुयायी कुठे होते, असा सवालही उपस्थित केला.  देशाच्या संविधानावर घाला घालण्याचे काम मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार करत असल्याचा आरोप करून, संविधान बदलण्याचे कारस्थान आम्ही हाणून पाडू, असा इशाराही त्यांनी दिला. देशात महागाई वाढली आहे, परंतु पंतप्रधान मोदी व त्यांच्या समर्थकांना त्याची काळजी नाही, तर त्यांना हनुमान चालिसा वाचण्याची काळजी आहे.यावेळी कॉम्रेड अंजलीताई महाबळेश्वरकर, शुभा शमीम, मरियम ढवळे यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक जनवादीच्या जिल्हा चिटणीस आनंदी अवघडे यांनी केले, सूत्रसंचालन प्राची हातिवलेकर यांनी केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार