शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी यांचा आत्मविश्वास डळमळीत, शरद पवार यांचे टीकास्त्र

By सचिन काकडे | Updated: May 9, 2024 15:38 IST

आपलं स्थान संकटात आल्याची त्यांना भीती

सातारा : इंडिया आघाडीला महाराष्ट्रात प्रचंड समर्थन मिळत आहे. हा प्रतिसाद पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे. आपले स्थान संकटात आल्याची त्यांना भीती वाटत आहे, अशी टीका करतानाच राज्यातून इंडिया आघाडीचे ३० ते ३५ खासदार निवडून येतील, असा विश्वास खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त खा. शरद पवार गुरुवारी साताऱ्यात आले होते. अभिवादनानंतर त्यांनी राष्ट्रवादी भवन येथे माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि एमआयएम या तीन पक्षांचे मिळून सहा खासदार निवडून आले. यंदा परिस्थिती वेगळी आहे. इंडिया आघाडीला महाराष्ट्रातून प्रचंड समर्थन मिळत असून, आघाडीचे ३० ते ३५ उमेदवार यंदा निवडून येतील. महाराष्ट्रात मिळणारे समर्थन पाहूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आत्मविश्वास गायब झाल्याची टीका पवार यांनी केली.इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार अजून निश्चित झाला नसल्याची टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली होती. याबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले, अमित शाह सांगतात त्यात काही अर्थ नाही. त्यांच्याच पक्षाचे मोरारजी देसाई हे पंतप्रधान झाले तेव्हा पंतप्रधान पदाचा उमेदवार कुठे ठरला होता? काँग्रेसमधील विलीनीकरणाच्या चर्चेबाबत छेडले असता ते म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस हे दोन्ही पक्ष २००१ पासून सोबत काम करत आहेत. दोन्ही पक्षांची विचारधारा एक आहे. आम्ही लोकसभेच्या निवडणुकाही एकत्रित लढविल्या आहेत. दोन्ही पक्षांनी एकत्र काम करणे गरजेचे असून, यापुढेही आम्ही एकत्र काम करणार आहोत. त्यामुळे विलीनीकरणाचा प्रश्नच येत नाही.यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, सारंग पाटील, दीपक पवार आदी उपस्थित होते.

भाजपसोबत जाण्याचा निर्णय नव्हता..भाजपसोबत जाण्याचा निर्णय पवार साहेबांनी घेतला होता, असे अजित पवार म्हणाले होते. माध्यमांनी या प्रश्नाबाबत छेडले असता शरद पवार म्हणाले, आमचा कोणताही निर्णय भाजप सोबत जाण्याचा नव्हता. आमची व भाजपची विचारधारा वेगळी आहे. आमच्यातील काही सहकारी भाजपमध्ये जाण्याच्या विचाराचे होते. मात्र, तो काही पक्षाचा निर्णय नव्हता.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsatara-pcसाताराlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदी