शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

नमस्कार.. मी सारिका जाधव बोलतेय..!

By admin | Updated: June 27, 2016 00:38 IST

अखेरीस नियतीने डाव साधला आणि डोळ्याच्या वाटेने ताप बाहेर पडला. सारिकाच्या नशिबी कायमचे अंधत्व देऊन गेला.जाधव दाम्पत्याने धीर सोडला नाही.

साहिल शहा --कोरेगाव  तापाचे निमित्त झालं अन् बालपणीच दृष्टी हिरावून बसलेल्या सारिका जाधव यांनी केवळ अंधत्वावर नव्हे, तर समाजातील डोळसपणावर मात करत यश मिळविले आहे. रयत शिक्षण संस्थेच्या कोरेगाव येथील डी. पी. भोसले कॉलेजमध्ये त्या फोन ड्यूटी करत आहेत.निसर्गाने अन्याय केला असला तरी रडत बसणं त्यांना ठावूकच नाही. महाविद्यालयात टेलिफोन आॅपरेटरचे काम करत इतर कामे आणि संसारातील सर्व कामे एकट्या करतात. त्यासाठी कोणाच्या मदतीची गरज पडत नाही. सारिका अवघी पाच वर्षांची असताना अचानक तापाने फणफणली. गाव आणि शहरात औषधोपचार केले; मात्र ताप काही कमी होत नव्हता. अखेरीस नियतीने डाव साधला आणि डोळ्याच्या वाटेने ताप बाहेर पडला. सारिकाच्या नशिबी कायमचे अंधत्व देऊन गेला.जाधव दाम्पत्याने धीर सोडला नाही. त्यांनी काही करून सारिका हिला शिकविण्याचा पण केला. त्यांनी साताऱ्याच्या सत्यशोध संस्थेची वाट चोखळली. हेमा सोनी आणि वाघमारे यांनी त्यांना धीर दिला. सारिकाची भेट घेऊन प्रोत्साहन दिले. सारिका यांनी जळगावमध्ये पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण ब्रेल लिपीसह सर्वसामान्य विद्यार्थ्यांबरोबर घेतले.दहावी परीक्षेत यश संपादन केल्यानंतर तिने रयत शिक्षण संस्थेच्या कोरेगाव येथील डी. पी. भोसले कॉलेजमध्ये अकरावीसाठी प्रवेश घेतला. इतर विद्यार्थ्यांप्रमाणे अकरावीचे शिक्षण पूर्ण केले आणि ‘सत्यशोध’च्या मदतीने रयत शिक्षण संस्थेत शिपाई म्हणून नोकरी पत्कारली. पुणे जिल्ह्यातील मंचर येथील कॉलेजवर नेमणूक झाली. पुढे नात्यातीलच बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या आणि पायात नकळत अपंगत्व असलेला शेतकरी अनिल बोराडे जुन्नर तालुक्यातील पारगाव येथील स्थळाचा शोध लावला. बघण्याचा कार्यक्रम झाला आणि नवरा-नवरीची पसंती झाल्यावर विवाह झाला. कन्यारत्न झाल्यानंतर सर्वांच्या आनंदाला पारावर उरला नाही. सारिका या कुटुंबीय व शिक्षकांच्या सहकार्याने तब्बल सात वर्षे नोकरी करत आहेत. मोबाईल क्रमांक तोंडपाठसर्व कर्मचारी आणि प्राध्यापकांचे संपर्क क्रमांक त्यांच्या तोंडपाठ आहेत. फोन लावणे, मोबाईलवरून कॉल करणे आणि आलेले कॉल स्वीकारणे हाच त्यांचा दिनक्रम झालेला आहे. त्या स्वत: मोबाईल वापरत असून, त्यावरील सर्व फंक्शन त्या आॅपरेट करतात, हे विशेष.