शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
2
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
3
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
6
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
7
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
8
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
9
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
10
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
11
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
12
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
13
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
14
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
15
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
16
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
17
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
18
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
19
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
20
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी

नालाबांध झाला पाझर तलाव ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 16:48 IST

सातारा : ग्रामस्थांमध्ये एकी असेल तर अशक्य कामेही शक्य होऊन जातात. त्यामुळे गावाचा विकास होतोच त्याचबरोबर हाच आदर्श इतरांसमोरही राहतो. अशाचप्रकारे माण तालुक्यातील बनगरवाडी गावाने एकीमुळे इतरांपुढे आदर्श ठेवला आहे. ओढ्यावरील नालाबांधाचे रुपांतर पाझर तलाव्यात केले असून यामुळे अडीच कोटी लिटर पाणीसाठा होणार आहे. तर दिडशे एकर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे. 

ठळक मुद्देबनगरवाडी ग्रामस्थांची एकी अडीच कोटी लिटर पाणीसाठा होणारदिडशे एकर क्षेत्राला फायदा दिडशे एकर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत

सातारा : ग्रामस्थांमध्ये एकी असेल तर अशक्य कामेही शक्य होऊन जातात. त्यामुळे गावाचा विकास होतोच त्याचबरोबर हाच आदर्श इतरांसमोरही राहतो. अशाचप्रकारे माण तालुक्यातील बनगरवाडी गावाने एकीमुळे इतरांपुढे आदर्श ठेवला आहे. ओढ्यावरील नालाबांधाचे रुपांतर पाझर तलाव्यात केले असून यामुळे अडीच कोटी लिटर पाणीसाठा होणार आहे. तर दिडशे एकर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे. 

माण तालुका म्हटला की समोर येतो तो दुष्काळ आणि पाण्याचे दुर्भिक्ष. सततची ही परिस्थिती आहे. मात्र, अलीकडील काहीकाळात यामध्ये बदल होत आहे. विकासासाठी गावे एक होऊ लागली आहेत. शासनाच्या मदतीशिवायही अनेक गावांनी लोकवर्गणी व श्रमदानातून मोठी कामे केली आहेत.

तालुक्यातील बनगरवाडी (वरकुटे मलवडी) गावाने एकत्र येत पाणीसाठ्याची अनेक कामे केली आहेत. यामधील प्रमुख काम म्हणजे नालाबांधाचे पाझर तलावत केलेले रुपांतर. येथील बामणकी ओढ्यावर गावाशेजारीच पूर्वी नालाबांध होता.

पावसाळ्यात सुमारे २०० एकर क्षेत्रावरून या नालाबांधात पाणी येते. मात्र, नालाबांधाला गळती असल्याने पाणी वाहून जायचे. त्यामुळे या नालाबांधाचा फायदा होत नव्हता. त्यातच माण तालुक्यात पाणलोट, वॉटर कप स्पर्धेमुळे गावागावांत पाणी चळवळ सुरू झाली. यातूनच आयकर विभागातील सह आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ एकत्र आले.

गावासाठी पाणी चळवळ राबवायचा निर्णय घेऊन एकी केली. त्यातूनच नालाबांधाचा पाझर तलाव होऊ लागला आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. 

ग्रामस्थ पाझर तलावासाठी रोज श्रमदान करत आहेत. सकाळी साडे आठ ते दहा वाजेपर्यंत ग्रामस्थ काम करतात. या पाझर तलावाच्या भिंतीची लांबी सुमारे १५० मिटर इतकी झाली आहे. लोकांनी स्वत: काम केल्याने काम दर्जेदार झाले असून याचा फायदा पाणीसाठा झाल्यानंतरच समोर येणार आहे. शासनाच्या मदतीशिवाय हे काम झाले आहे. यामागे गावाची एकीच कारणीभूत ठरली आहे. 

पाझर तलावाची स्थिती...

भिंतींची लांबी १५० मिटर१० फूट उंचीचा तसेच पाठीमागे २५० मिटरपर्यंत पाणीसाठा होणार १५० एकर क्षेत्र ओलिताखाली येणार परिसरातील ६० विहिरींना फायदा दहा लाखांच्या शासकीय अंदाजाचे काम फक्त ३ लाखांत चहा, नाष्ट्याची सोय...दररोज सकाळी ग्रामस्थ श्रमदानासाठी येतात. त्यांच्यासाठी अनेकजण स्वइच्छेने चहा, नाष्ट्यांची सोय करतात. या कामाची पाहणी आसपासच्या गावांतील ग्रामस्थांनीही केली आहे. शासकीय अधिकाºयांनीही या कामाला भेट दिली आहे.