शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राजे जिंकलंत! फलटणच्या नाईक निंबाळकरांनी १०० वर्ष जुना राजवाडा कोविड रुग्णांसाठी दिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 11:34 IST

कोरोना संकटकाळात नाईक-निंबाळकर घराण्याने फलटण आणि आसपास केलेल्या मदतीचं कौतुकही अनेक जण करत आहेत

सातारा – जिल्ह्यात वाढणारी कोरोना रुग्णसंख्या पाहून फलटणच्या रामराजे नाईक निंबाळकर घराण्याने लोकाभिमुख निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रशासनाला पत्र लिहून त्यांच्या २ वास्तू कोविड रुग्णांसाठी वापरण्याची तयारी दर्शवली आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण येथे रामराजे यांच्या मालकीचा १०० वर्ष जुना राजवाडा विक्रम पॅलेस आहे. कोविड सेंटरसाठी हा राजवाडा देण्याची तयारी नाईक-निंबाळकर कुटुंबाने दाखवली आहे.

या संदर्भात रामराजेंनी सातारा जिल्हा प्रशासनाला पत्र लिहिलं आहे की, आमचे सोनगाव येथील विक्रम पॅलेस आणि फलटण येथील मुधोजी मनमोहन राजवाडा हा कोविड रुग्णांच्या सेवेसाठी देण्याची तयारी आहे. विक्रम पॅलेस हा नाईक निंबाळकर यांच्या नातेवाईकांचा आहे. या पॅलेसमध्ये अनेक छोट्या रुम्स आहेत. त्यामुळे याठिकाणी कोविड सेंटर उभारलं जाऊ शकतं. ग्रामीण भागात वाढणाऱ्या कोरोना बाधितांमुळे रामराजेंनी हा निर्णय घेतला आहे.

फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांचा विक्रम पॅलेस देण्याबाबतचे पत्र प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांना दिले आहे. रघुनाथराजे निंबाळकर हे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू आहेत. या पत्रात लिहिल्याप्रमाणे पॅलेसमधील खालचा मजला हा महिलांसाठी तर वरील मजल्यावर पुरुष रुग्णांची व्यवस्था करता येईल. त्यासोबत आणखी गरज भासली तर फलटणचा मुधोजी मनमोहन राजवाडाही देण्याची तयारी आहे.

कोरोना संकटकाळात नाईक-निंबाळकर घराण्याने फलटण आणि आसपास केलेल्या मदतीचं कौतुकही अनेक जण करत आहेत. त्यात राजवाडा देण्याच्या निर्णयामुळे अनेकांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. रघुनाथराजे निंबाळकरांनी लॉकडाऊनमध्ये फिरता दवाखान्याच्या माध्यमातून मोफत तपासणी आणि औषधांची सोय गावोगावी केली होती. तर शहरात अडकलेल्या परराज्यातील मजुरांसाठी मोफत बसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRamraje Naik-Nimbalkarरामराजे नाईक-निंबाळकर