शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

मुंबईत मुत्सदेगिरी.. भुर्इंजला गनिमी कावा-राजकीय डावपेच : सातारी बाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 00:56 IST

-दीपक शिंदे सातारा : जिल्ह्याचे राजकारण दोन महत्त्वाच्या राजकीय घटनांनी ढवळून निघाले. खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी अखेर राष्ट्रवादी ...

ठळक मुद्देभाजपला कामी आला मदत अन् युक्तीचा फार्म्युलापक्षांच्या वाढीसाठी नेत्यांची दिलजमाई

-दीपक शिंदेसातारा : जिल्ह्याचे राजकारण दोन महत्त्वाच्या राजकीय घटनांनी ढवळून निघाले. खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसकडून निश्चित झाली. मुत्सदेगिरीत वाकीब असलेल्या शरद पवार यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादी पुन्हा एकत्र बांधण्यात यश मिळविले. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे माजी आमदार मदन भोसले यांना गनिमी काव्याने भाजपमध्ये ओढून नेले. पक्ष राखण्याच्या, वाढविण्याच्या दृष्टीने एका नेत्याची मुत्सदेगिरी तर दुसऱ्या नेत्याचा गनिमी कावा उपयोगी पडला.

खासदार उदयनराजेंना राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा उमेदवारी मिळणार की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात होती. उदयनराजेंच्या उमेदवारीला आमदारांचा असलेला विरोध आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधील नाराजीमुळे उमेदवारी मिळणार की नाही, याबाबत टांगती तलवार होती. यावर पडदा टाकण्याचा यशस्वी प्रयत्न राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केला. मुंबईमध्ये झालेल्या आमदार आणि पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत खासदार उदयनराजे भोसले यांनाच पुन्हा एकदा लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली. असे झाले नसते तर उदयनराजे राष्ट्रवादी सोडून इतर पक्षांत गेले असते. त्यामुळे होणारे राष्ट्रवादीचे नुकसान न भरून येण्यासारखे होते. त्याबरोबरच उदयनराजे लोकसभेच्या प्रचारात उतरले असते तर त्याचा इतर मतदार संघातही फरक पडला असता. कोल्हापूरचे राजे गमावल्याचे शरद पवार यांच्या खूप जिव्हारी लागले होते. आता पुन्हा दुसºया राजेंना गमावण्याचा धोका त्यांना पत्करायचा नव्हता. उदयनराजेंनी राष्ट्रवादी पक्षाच्या मदतीशिवाय आपली स्वत:ची ताकद निर्माण केली होती. त्याचा त्यांना उपयोग करता आला असता. उलट आता राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाल्यानंतर राष्ट्रवादी आणि इतर मित्रांचीही त्यांना मदत होणार आहे. त्यामुळे उदयनराजेंना लोकसभेचा विजय अधिक सोपा होण्यास मदत होणार आहे.

केवळ सातारा लोकसभा मतदार संघासाठीच नव्हे तर माढा लोकसभा मतदार संघातही उदयनराजे भोसले आणि त्यांच्या मित्रांचा उपयोग होणार आहे. त्यासाठीच हा केलेला प्रयत्न आहे. आमदारांनी शरद पवार यांच्यासमोरही आपल्या अडचणी मांडल्या. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तर वैयक्तिक तक्रारी आणि कार्यकर्त्यांचीही बाजू मांडली. पण एकत्र राहायचे आहे आणि पक्षाच्या आणि स्वत:च्या अडचणी वाढवायच्या नसतील तर उदयनराजेंना सोबत घेण्यावाचून राष्ट्रवादीसमोर पर्याय नव्हता. शरद पवारांनी हे कधीच ओळखले होते. त्यामुळे इतर नेत्यांचे भाजपमधील प्रवेशाची संख्या वाढत असताना पूर्वनियोजित बैठक वेळेपूर्वीच घेऊन आमदार आणि खासदार उदयनराजे यांच्यामध्ये असलेले मतभेद दूर करण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला.

मुंबईमध्ये या घडामोडी घडत असतानाच दुसरीकडे किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या मैदानावर पक्ष वाढीसाठी भाजपचा गनिमी कावा सुरू होता. गेल्या अनेक दिवसांपासून मदन भोसले यांना विविध पातळ््यांवर मदत करून त्यांना भाजपमध्ये ओढण्याचा भाजप नेत्यांचा डाव काही केल्या यशस्वी होत नव्हता. मदन भोसले सुद्धा कामापुरता आपला वापर करून घेत आहेत आणि मदतीच्यावेळी बाहेरून मदत करू, अशी भूमिका घेत आहेत, हे भाजप नेत्यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे काहीही करून आता मदन भोसलेंचा भाजप प्रवेश करायचाच, या उद्देशाने आलेल्या नेत्यांनी मदन भोसले यांचे प्रास्ताविक संपताच...एकावर एक शाब्दिक खेळ््या करण्यास सुरुवात केली... आता किती दिवस थांबायचे... किती अंत पाहायचा, अशी साद घालत आता नाही तर मग कधी.. मित्रांना तलवार देता आणि एकट्यालाच लढायला सांगता, हे चालणार नाही.

लढायचे तर सोबत राहून लढू, अशी भावनिक हाक देण्यात आली. काही केल्या मदन भोसले यांचे मन धजावत नव्हते. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उठून भाजपचा स्कार्फ गळ््यात घालण्याचा आणि झेंडा हातात देण्याचा प्रयत्न केला; पण मदन भोसले यांनी व्यासपीठाकडे जात ‘मला थोडा वेळ द्या,’ अशी विनवणी केली. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना पुन्हा शांत बसावे लागले. पण ‘आता थांबणे नाही,’ असे मनाशी ठाण मांडून आलेल्या सुभाष देशमुख यांनी काहीही ऐकले नाही... पुन्हा त्यांनी फटकेबाजी सुरू केली आणि मदन भोसले अखेर भाजपवासी झाले. काही क्षणातच संपूर्ण मांडवामध्ये स्कार्फ वाटण्यात आले आणि कारखाना स्थळावरच्या कार्यक्रमाला भाजपच्या कार्यक्रमाचे स्वरूप प्राप्त झाले. यासाठी सर्व तयारी भाजपने केली होती. त्यासाठी अगोदरच झेंडे आणि स्कार्फही तयार ठेवण्यात आले होते. भाजपच्या नेत्यांचा हा गनिमी कावा उपयोगी पडला आणि फार नाही; पण काही प्रमाणात आपली ताकद वाढविण्यात त्यांना यश आहे.

राष्ट्रवादीने आपल्याच खासदारांना पक्षातून बाहेर पडण्यापासून थांबविले तर भाजपने काँग्रेसच्या माजी आमदारांना पक्षात आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला. दोन्ही घटना जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळी कलाटणी देणाºया आहेत. एका ठिकाणी मुत्सद्देगिरी कामाला आली तर दुसºया ठिकाणी गनिमी कावा. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत याचा नक्कीच दोन्ही पक्षांना फायदा होईल.स्वत:च्या ताकदीवरच लोकसभा अन् विधानसभाही...मनाने आणि विचाराने लांब गेलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केला असला तरी हे नेते आणि कार्यकर्ते अपेक्षित क्षमतेने काम करतील, असे निश्चित सांगता येत नाही. तसा कोणालाच विश्वास नाही. त्यामुळे लोकसभा असो किंवा विधानसभेसाठी प्रत्येकाला आपली ताकद वापरावीच लागेल. त्याबरोबरच पक्षालाही आपली ताकद लावाली लागेल. असे झाले तरच पक्षाची वाताहत होण्यापासून वाचविता येईल आणि पक्ष वाढीसाठीही राष्ट्रवादी काँग्रेसला त्याचा निश्चित उपयोग होईल.माढ्यात नको ठेच म्हणून सोडविला साताºयाचा पेचसातारा लोकसभा मतदार संघाबरोबरच शेजारच्या मतदार संघातही उदयनराजेंचा उपद्रव होऊ शकतो. माढा लोकसभा मतदार संघातही उदयनराजेंना मानणारा गट आहे. तिथेही अनेकांशी त्यांनी सख्य जमविले आहे. त्याठिकाणी फटका बसू नये यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. केवळ माढाच नाही तर कोल्हापुरातील मैत्री, सांगलीतील जवळीक आणि माढ्यातील दोस्ती फायद्याची ठरावी, राज्यात स्टार प्रचारक म्हणून त्यांचा उपयोग व्हावा आणि लोकसभेतील राष्ट्रवादीच्या खासदारांचा आकडा वाढावा यासाठीच पुन्हा एकदा सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याची जोरदार चर्चा आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारण