शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात तरुणावर कोयत्याने खुनी हल्ला, हल्लेखोर फरार

By नितीन काळेल | Updated: June 9, 2023 22:04 IST

 महिला ताब्यात; जखमीला पुण्याला हलिवले

नितीन काळेल सातारा :सातारा शहरातील राजवाडा परिसरात शुक्रवारी दुपारच्या सुमारास एका तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला अधिक उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले आहे. तर प्राथमिकदृष्टया दोन हल्लेखोर दिसून आले असून त्यांचा शोध सुरू आहे.

याबाबत घटनास्थळावरुन प्राथमिकदृष्टया मिळालेली आणि पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास शहरातील राजधानी टाॅवर्ससमोरील समऱ्थ मंदिर रस्त्यावर महिला आणि तरुणात वाद सुरू होता. त्यानंतर याठिकाणी आणखी काहीजण आले. यावेळी त्यांनी तरुणावर कोयत्याने हल्ला केला. डोके, खांदा, पाठीवर हे वार झाले. यामुळे रस्त्यावरच रक्त सांडले. या हल्ल्यानंतर जखमी तरुणाला दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

पण, प्रकृती गंभीर असल्याने अधिक उपचारासाठी त्याला पुणे येथे हलिवण्यात आले आहे. संबंधित तरुणाचे नाव गणेश शंकर पैलवान असल्याची माहिती मिळत असून तो शहरातीलच रहिवाशी आहे. तर या हल्ल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडून माहिती घेण्याचे काम सुरू आहे. इतर हल्लेखोर फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. तर रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी कोणताही गुन्हा नोंद झाला नव्हता. 

पोलिस अधीक्षकांची घटनास्थळी भेट... पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी रात्री आठच्या सुमारास घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. यावेळी शाहूपुरी ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय पतंगे उपस्थित होते. तर सातारा शहरात पेट्रोलिंग सुरू आहे. अशा घटना घडल्यास पोलिस घटनास्थळी जाऊन कारवाई करत आहेत. गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याचे काम पोलिस करत असून जागरुक नागरिक म्हणून पिडीतास मदत आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक शेख यांनी केले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsatara-acसातारा