शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंटच्या कट्टयावर आपटून तरूणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 20:55 IST

murder, sataranews ऐन भाऊबीजेच्या दिवशी सिमेंटच्या कट्टयावर आपटून २२ वर्षीय तरूणाचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना मुंजवडी, ता. फलटण येथे घडली. आशिष सुनील माने असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहाजणांना अटक केली आहे.

ठळक मुद्देसिमेंटच्या कट्टयावर आपटून तरूणाचा खून मुंजवडीतील घटना; सहाजणांना अटक

फलटण: ऐन भाऊबीजेच्या दिवशी सिमेंटच्या कट्टयावर आपटून २२ वर्षीय तरूणाचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना मुंजवडी, ता. फलटण येथे घडली. आशिष सुनील माने असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहाजणांना अटक केली आहे.रोहीत दादा खोमणे (रा. मुंजवडी), आशाबाई उर्फ नकुसा अरुण आडके (रा. पाटस जि. पुण)े, दत्तू बबन सितकल (रा. मुंजवडी), सुनील अरुण आडके (रा. पाटस जि. पुणे), जया बाळू जाधव (रा. आसू ता. फलटण), अर्चना दादा खोमणे, (रा. मुंजवडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, सोमवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी आशिष याची सासरवाडी गावातच आहे. पत्नी कामिनीला त्याने भाऊबीजेला मुंजवडी येथे तिच्या माहेरी सोडले होते. दुपारी ते पत्नीला घरी परत घेऊन आले तेव्हा कामिनीने आपली सासू सुनिता माने यांना सांगितले की, मुंजवडी गावातीलच अर्चना दादा खोमणे, तिचा मुलगा रोहीत दादा खोमणे व बहीण जया बाळू जाधव यांनी माझ्या माहेरी घरी येऊन आई सविता मधुकर येडे व मला माझ्या चारित्र्याचा संशय घेऊन मुलगा रोहीत याला सारखा फोन करते, असे म्हणत शिवीगाळ केली.

यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास वरील संशयित हे मुंजवडीतील आशिष माने यांच्या घरासमोर येऊन शिवीगाळ करु लागले. अर्चना खोमणे यांनी आपला मुलगा रोहीत याला तुझी सुन कामिनी ही सारखी फोन करुन बोलावते, असे सुनिता माने यांना म्हणत घरासमोर उभा असलेल्या त्यांचा मुलगा आशिष माने याला रोहीत खोमणे, दत्तु सितकल, सुनिल आडके यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर सिमेंट कट्टयावर जोरात आपटले. त्यामुळे तो जागेवरच बेशुध्द पडला.सुन कामिनी हिला लाथा-बुक्क्यांनी, दगड-विटांनी मारहाण केली. भांडण सोडविण्यास गेलेल्या आशिष याचा भाऊ संकेत यालाही सुनील आडके याने कुऱ्हाडीने डोक्यात मारले. यावेळी झालेला आरडाओरड व गोंधळ ऐकूण शेजारी पाजारी जमा झाल्यानंतर ते सर्वजण पळून गेले. बेशुध्दावस्थेतील आशिष याला फलटण येथे खासगी रुग्णालयात आणले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आशिष याची आई सुनीता सुनील माने (वय ४०, रा. मुंजवडी) यांनी फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस निरीक्षक नितीन सावंत हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :MurderखूनSatara areaसातारा परिसर