शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

छेड करणाऱ्या युवकाचा खून करून पाय तोडला, वडूथमधील घटनेने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 15:16 IST

बहिणीची छेड काढून सतत त्रास देत असल्याच्या रागातून दोन चुलत सख्ख्या भावांनी एका युवकाचा खून करून त्याचा पाय तोडल्याची खळबळजनक घटना वडूथ, ता. सातारा येथे मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघा चुलत भावांना अटक केली आहे.

ठळक मुद्देछेड करणाऱ्या युवकाचा खून करून पाय तोडला, वडूथमधील घटनेने खळबळदोन सख्ख्या चुलत भावांना अटक

सातारा : बहिणीची छेड काढून सतत त्रास देत असल्याच्या रागातून दोन चुलत सख्ख्या भावांनी एका युवकाचा खून करून त्याचा पाय तोडल्याची खळबळजनक घटना वडूथ, ता. सातारा येथे मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघा चुलत भावांना अटक केली आहे.सचिन विठ्ठल पवार (वय ३०, रा. वडूथ, ता. सातारा) असे खून झालेल्याचे तर रणजित बाळकृष्ण साबळे, अमित दत्तात्रय साबळे (रा. वडूथ, ता. सातारा) असे संशयित आरोपींची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सचिन पवार संशयिताच्या बहिणीला त्रास देत होता. तसेच तिच्या मुलीलाही काही दिवसांपूर्वी त्याने मारहाण केली होती. यामुळे दोघे सख्खे चुलत भाऊ सचिन पवारवर चिडून होते.दरम्यान, मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास लॉकडाऊमुळे माणसे घरातच थांबून होती. याचवेळी संशयित रणजित आणि अमित या दोघांनीही सचिनवर त्याच्या घरासमोरच कुऱ्हाडीने आणि फरशीने वार करून त्याचा खून केला. तसेच त्याचा डाव पाय घोट्यापासून तोडला. त्यामुळे रक्तस्त्राव होऊन सचिनचा जागीच मृत्यू झाला.या घटनेची माहिती सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांना मिळाल्यानंतर ते आपल्या सहकाऱ्यांसह तत्काळ वडूथ येथे दाखल झाले. त्यावेळी सचिनचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता तर बाजूलाच त्याचा तुटलेला पाय पडला असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलिसांनी या खुनाबाबत माहिती मिळवून तत्काळ रणजित आणि अमितला अटक केली. न्यायालयासमोर त्यांना हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही दि. २४ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी हवालदार धीरज कुंभार यांनी फिर्याद दिली असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक सजन हंकारे हे करत आहेत. तो एकटाच राहत होता..सचिन पवारच्या आई-वडिलांचे सुमारे तीन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. तो एकटाच राहत होता. त्याला ना बहीण ना भाऊ.तो मूळचा शिवथरचा; मात्र त्याला वतनावर वडूथमधील जमीन मिळाली. त्यामुळे तो वडूथमध्ये राहत होता. काही वर्षांपूर्वी त्याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात एसटी चालकाला मारहाण केल्याचा गुन्हाही दाखल होता, असेही पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :MurderखूनSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस