शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

डोक्यात दगड घालून बांधकाम मुकादमाचा खून ; दोन मजुरांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 17:09 IST

मजुरीचे पैसे न दिल्याच्या कारणावरुन दोन मजुरांनी बांधकाम मुकादम असलेल्या राजू पवार (वय ३७, रा. अमरावती) याच्या छातीवर आणि डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला. ही घटना कोरेगाव तालुक्यातील जळगाव येथे शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी दोन मजुरांना अटक केली आहे.

ठळक मुद्देकोरेगाव तालुक्यातील जळगावमधील घटना; दोन मजुरांना अटकडोक्यात दगड घालून बांधकाम मुकादमाचा खून

कोरेगाव : मजुरीचे पैसे न दिल्याच्या कारणावरुन दोन मजुरांनी बांधकाम मुकादम असलेल्या राजू पवार (वय ३७, रा. अमरावती) याच्या छातीवर आणि डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला. ही घटना कोरेगाव तालुक्यातील जळगाव येथे शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी दोन मजुरांना अटक केली आहे.नागेश रामचंद्र बंजत्री (रा. चिंचोळी, ता. मुद्दे बिहाळ, जि. विजापूर, कर्नाटक), किरण बाबुराव पाटील ( रा. उजळाईवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर, सध्या दोघेही रा. भीमनगर, ता. कोरेगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राजू पवार याच्यासोबत नागेश बंजत्री, किरण पाटील हे बांधकामावर मजूर म्हणून काम करत होते. हे तिघेही जांब बुद्रुक, ता. कोरेगाव येथे निवासी इमारतीचे काम सुरु असल्याने गत १५ दिवसांपासून तेथेच राहत होते.

गुरुवारी सायंकाळी तिघेजण जांब बुद्रुक ते जळगाव रस्त्याने चालत येत होते. मजुरीच्या पैशांवरुन राजू पवार याच्याबरोबर नागेश बंजत्री व किरण पाटील यांचा वाद झाला. जळगाव गावानजिक माळ नावाच्या शिवारात तिघांमध्ये जोरदार भांडण झाले. तिघेजण मुख्य रस्त्यापासून आतील बाजूस शेतातील ओघळीमध्ये गेले. तेथे दोघांनी राजू याला खाली पाडले.

नागेश याने जवळच पडलेला मोठा दगड घेतला आणि तो राजू याच्या छातीवर घातला. त्यानंतर किरण याने तोच दगड घेऊन राजूच्या डोक्यात घातला. यामध्ये राजूच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा झाला. या प्रकारानंतर दोघांनी तेथून पळ काढला.शुक्रवारी सकाळी जळगाव येथील बापू कृष्णात जाधव हे आपल्या शेतात गेले होते, त्यावेळी त्यांना ओढ्यामध्ये मृतदेह दिसला. त्यांनी पोलीस पाटील विश्वनाथ पवार यांना याची माहिती दिली. त्यानंतर हा प्रकार पोलिसांनाही समजला. पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. काही तासांतच पोलिसांनी नागेश आणि किरण यांना अटक केली.राजू पवारचा ठाव ठिकाणा नाही..राजू पवार हा गत काही महिन्यांपासून कोरेगाव तालुक्यात काम करत आहे. तो सर्वांना अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगत होता. मात्र, घरातून त्याला कमी प्रमाणात फोन यायचे, जर एखादा फोन आला तर, तो कानडीमध्ये बोलत असल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे. भीमनगरमध्ये तो तात्पुरत्या स्वरुपात राहत होता. राजू पवार हा नेमका कुठला आहे, त्याचा पत्ता काय, त्याने यापूर्वी कोणाकडे काम केले आहे, याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे.

 

टॅग्स :MurderखूनSatara areaसातारा परिसर