शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

नगराध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी मुंडण

By admin | Updated: June 30, 2017 23:11 IST

नगराध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी मुंडण

लोकमत न्यूज नेटवर्कवाई : लाचखोरीची कारवाई झालेल्या नगराध्यक्षा डॉ़ प्रतिभा शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी करत शुक्रवारी पालिकेतील विरोधक व नागरिकांनी पालिकेसमोर मुडंण आंदोलन केले. नगराध्यक्षांचा जाहिर निषेध व्यक्त करत यावेळी सतरा नागरिकांनी मुंडण केले.नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांच्या लाचखोरी प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादी पुरस्कृत तीर्थक्षेत्र विकास आघाडीने अंदोलनाचे हत्यार उपसले आहे़ या आंदोलनाचा एक भाग म्हणून शुक्रवारी विरोधकांनी पालिकेसमोर मुंडण आंदोलन केले.सकाळी ११ वाजता विरोधक मोठ्या संख्येने पालिकेसमोर एकत्र आले. यानंतर नगराध्यक्षांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी नगराध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी करत एकूण १७ नागरिकांनी मुंडण आंदोलन केले. या आंदोलनात उपनगराध्यक्ष अनिल सावंत, तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अध्यक्ष संजय लोळे, माजी नगराध्यक्ष भुषन गायकवाड, अ‍ॅड़ श्रीकांत चव्हाण, नगरसेवक प्रदीप चोरगे, राजेश गुरव, भारत खामकर, चरण गायकवाड यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.विरोधकांना राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार नाही...भाजपकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, वाई पालिकेतील तीर्थक्षेत्र आघाडीने नगराध्यक्षांच्या विरोधात अंदोलन उभारले आहे़ हे अंदोलन उभारणाऱ्या विरोधकांना राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार नाही़ ते केवळ वैयक्तीक आकसापोटी नगराध्यक्षांना वेठीस धरत असून पालिकेच्या कारभारला खिळ घालत आहेत. विरोधकांना नैतिकतेचा पुळका असेल तर बाजार समितीचे सभापतींचे हमालांचा गाळा हडप करण्याचे प्रकरण व पंचायत समितीचे उपसभापती यांनी पेट्रोल पंपात धांदली करून कोट्यवधी रूपयांची जनतेची लयलूट केली आहे याचा हिशोब आधी द्यावा़ विरोधकांनी आपल्या दिव्याखालचा अंधार डोळे उघडे करून पहावा, असाही आरोप निवेदनात केला आहे़