शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वरच्या वेण्णालेक परिसरात मुंबईच्या पर्यटकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 16:11 IST

महाबळेश्वर : मुंबईहून फिरण्यासाठी आलेल्या वयोवृद्ध पर्यटक हसमुख करमशी गाला (वय ७९, रा. ठाणे) यांचा बुधवारी अचानक मृत्यू झाला. ...

महाबळेश्वर : मुंबईहून फिरण्यासाठी आलेल्या वयोवृद्ध पर्यटक हसमुख करमशी गाला (वय ७९, रा. ठाणे) यांचा बुधवारी अचानक मृत्यू झाला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.महाबळेश्वर पोलिस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की, शांतीलाल करमशी गाला (वय ६८, रा. परळ, मुंबई) यांनी दिलेल्या माहितीनुसार, शांतीलाल, हसमुख, मनीलाल, चुनीलाल फिरण्यासाठी महाबळेश्वरला आले होते. दुपारी चौघेही हॉटेलहून बाहेर पडून महाबळेश्वर मंदिर, ईको पॉइंट व गार्डन येथे फिरले. त्यानंतर वेण्णालेक येथे बोटिंग करून बाहेर पडले असता दुपारी सव्वा चार वाजता हसमुख गाला यांना अचानक चक्कर आली व ते जमिनीवर कोसळले. नातेवाइकांनी तातडीने खासगी वाहनाने ग्रामीण रुग्णालय, महाबळेश्वर येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.वृद्धापकाळामुळे नैसर्गिक मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी मृत्यू अचानक व सार्वजनिक ठिकाणी झाल्याने घटनेबाबत संशय निर्माण झाला आहे. महाबळेश्वर पोलिसांनी याबाबत नोंद घेत चौकशी सुरू केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर याच्या मार्गदर्शनखाली पोलिस हवालदार संतोष शेलार करत आहेत.