शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्हा परिषदेत राजकीय कार्यकर्त्याची मुजोरी; सुरक्षारक्षकाला मारहाण, कर्मचाऱ्यांतून संताप 

By नितीन काळेल | Updated: August 2, 2023 17:32 IST

सातारा : सातारा जिल्हा परिषदेत राजकीय कार्यकर्त्यांच्या मुजोरीचे प्रकार वाढत असून बुधवारी तर एकाने सुरक्षारक्षकाला मारहाण केली. गाडी पार्कच्या ...

सातारा : सातारा जिल्हा परिषदेत राजकीय कार्यकर्त्यांच्या मुजोरीचे प्रकार वाढत असून बुधवारी तर एकाने सुरक्षारक्षकाला मारहाण केली. गाडी पार्कच्या कारणावरुन हा प्रकार झाला. याबाबतचा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. तर या घटनेमुळे कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.याबाबत समजलेली माहिती अशी की, सातारा जिल्हा परिषदेत दररोज शेकडोच्या संख्येने लोक येतात. यातील अनेकजण वाहन घेऊन येतात. त्यासाठी जिल्हा परिषद आवारात वाहने उभे करण्याची ठिकाणी निश्चीत झालेली आहे. अधिकाऱ्यांची एका बाजुला वाहने असतात. तर कर्मचारी दुचाकीसारखी वाहने समोर उभी करतात. त्याच ठिकाणी कामासाठी येणारे नागरिकही दुचाकी उभ्या करतात. इथपर्यंत ठिक आहे. पण, काहीजण कार घेऊन येतात. तसेच ही वाहने मुख्य दरवाजासमोरच उभी करतात. याठिकाणी अधिकाऱ्यांचे वाहनही कधी त्यांच्या चालकाने उभे केले नाही. मात्र, जिल्हा परिषदेत कामासाठी येणारे राजकीय कार्यकर्ते दमबाजी करत मुख्य दरवाजासमोरच गाडी उभी करतात. त्यावेळी तेथील सुरक्षा रक्षक संबंधितांना मज्जाव करतात. त्यामुळे नाईलाजास्तव का असेना कार तेथून दुसरीकडे नेण्यात येते. पण, नेहमीच असा प्रकार होतो. त्यातूनच सुरक्षरक्षकांशी वादावादी होते. आज, बुधवारीही असा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.आज, दुपारी एकच्या सुमारास एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी आला होता. त्याच्याबरोबर कार्यकर्तेही होते. सर्वजण चारचाकी वाहनातून आलेले. मुख्य दरवाजासमोरच गाडी उभी केली. त्यातून सर्वजण खाली उतरले. त्यावेळी गाडी समोरच उभी केल्याचे पाहून तेथील सुरक्षारक्षकाने गाडी दुसरीकडे पार्क करण्याबाबत सांगतले. त्यामुळे संबंधित कार्यकर्ता चांगलाच चिडला. त्यातून बाचाबाची झाली. त्यानंतर सुरक्षारक्षक आणि राजकीय पक्षाचे दोघे कार्यकर्ते इमारतीत आले. त्यावेळी कार्यकर्त्याने सुरक्षारक्षकाला धक्काबुक्की करत मारहाण केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

त्यानंतर घडलेली घटना सुरक्षारक्षकांनी कर्मचाऱ्यांना सांगितली. पण, राजकीय कार्यकर्त्याच्या मुजोरीत वाढ झाल्याचेच यावरुन दिसून येत आहे. यामुळे अशा कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरzpजिल्हा परिषद