सातारा : मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या सातारा शहरासह क्रिकेट क्षेत्राच्या विकासासाठी बैठकीचे आयोजन करावे. यासाठी माझे निश्चितच योगदान राहील, असे आश्वासन भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिलदेव निखंज यांनी दिले.खासदार उदयनराजे भोसले, दमयंतीराजे भोसले यांची विमान प्रवासावेळी कपिलदेव यांच्याशी भेट झाली. यावेळी त्यांनी उदयनराजे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. या भेटीत कपिलदेव यांनी १९८३ च्या विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्ध केलेल्या नाबाद १७५ धावांच्या अविस्मरणीय खेळीला उजाळा मिळाला. या खेळीचं आजही जगभरातील क्रिकेटप्रेमी कौतुक करतात. सातारा आणि महाराष्ट्रातील क्रिकेट क्षेत्राच्या विकासासाठी काय करता येईल, यावरही चर्चा झाली. यासंदर्भात विशेष बैठक आयोजित केल्यास योग्य ते योगदान देण्याची तयारी कपिलदेव यांनी दर्शवली.
सातारा शहरासह क्रिकेटसाठी निश्चित योगदान देऊ, कपिलदेव यांनी दिले आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 16:49 IST