शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
5
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
6
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
7
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
8
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
9
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
10
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
11
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
12
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
13
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
14
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
15
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
16
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
17
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
19
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
20
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

माढ्याच्या रणांगणासाठी शरद पवार यांच्याकडून माणला ‘मान’! जानकरांना बरोबर घेण्याच्या हालचाली अंतिम टप्प्यात  

By नितीन काळेल | Updated: March 23, 2024 19:34 IST

राष्ट्रवादी पदाधिकारी म्हणतात तुतारी वाजवावी 

सातारा : आघाडीतील राष्ट्रवादीकडून माढ्याचा उमेदवार ठरला नसलातरी ‘रासप’चे अध्यक्ष महादेव जानकर यांना बरोबर घेण्यासाठीच्या हालचाली अंतिम टप्प्यात आहेत. असे असतानाच आता तुतारी चिन्हावर निवडणूक लढविण्याची विनंती पदाधिकाऱ्यांकडून होऊ लागली आहे. त्यामुळे शरद पवार पदाधिकाऱ्यांच्या विनंतीला होकार देणार की माण तालुक्यातील जानकर यांना ‘मान’ देणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.माढालोकसभा मतदारसंघात महायुतीतील भाजपने उमेदवार जाहीर केला आहे. सध्या या उमेदवारीवरुन महायुती अंतर्गतच नाराजीनाट्य सुरू आहे. त्यातच याला अनेक दिवस उलटून गेले तरीही त्यावर पडदा पडलेला नाही. रामराजे नाईक-निंबाळकर यांचा खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याबद्दलचा विरोध मावळण्याची शक्यताही कमीच आहे. तर अकलुजचे मोहिते-पाटीलही नाराज आहेत. भाजपने त्यांची नाराजी दूर न केल्यास ते राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडूनही दंड थोपटू शकतात. या जर-तरच्या घडामोडीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचेही लक्ष असणार आहे. कारण, त्यांनाही माढा पुन्हा जिंकायचा आहे. यासाठी रणनिती आखत मतदारसंघाकडे त्यांचे लक्ष आहे. त्यातच माढा निवडणुकीला अजून खूप वेळ असल्याने घाईघाईने निर्णय घेण्याकडेही त्यांचा कल नाही. त्यामुळे धुरंदरपणे ते माढ्याकडे पाहत आहेत. महायुतीतील कोणी आपल्याकडे येणार का ? याविषयी ते चाचपणी करत असल्याची माहिती मिळत आहे. अशातच ‘रासप’चे अध्यक्ष महादेव जानकर यांचा पर्यायही त्यांनी समोर ठेवलेला आहे.जानकर यांच्याबरोबर त्यांच्या भेटीही झाल्या आहेत. पण, अंतिम आदेश अजून पवार यांनी दिलेला नाही. सकारात्मक बोलण्या पलीकडे काहीही झालेले नाही. त्यामुळे पवार काय राजकीय खेळी करणार का ? हे लवकरच समोर येणार आहे. त्यातच राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही पवार यांच्याकडे माढ्याची निवडणूक ही तुतारी चिन्हावरच लढविण्याचा आग्रह धरल्याची नवीन माहिती समोर आली आहे. यासाठी पक्षात कोणाला सामावून घ्या, नाहीतर पक्षातीलच कोणालाही उमेदवार द्या, पण, पक्षचिन्ह निवडणुकीत राहू द्या असा घोषाच पदाधिकाऱ्यांनी लावून धरला आहे. त्यामुळे पवार काय निर्णय घेणार हे पाहणेही महत्वाचे ठरले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी आता चिन्हावर लढावे..माढा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील चार आणि माणमधील दोन विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील तीन विधानसभा मतदारसंघाचे आमदार राष्ट्रवादीचे असेलतरी ते अजित पवार यांच्याबरोबर आहेत. त्यामुळे शरद पवार गटाची ताकद कमी आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बरोबर घेऊनच पवार यांना ही खिंड लढवावी लागणार आहे. त्यातच सहा महिन्यांनी विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीची तयारी म्हणून पक्ष चिन्हावर आता लढावे, अशी विनंती पवार यांना होत आहे. कारण, विधानसभा निवडणुकीपर्यंत पक्षचिन्ह मतदारापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. तसेच आताच्या निवडणुकीत चिन्ह राहिल्यास प्रचारालाही बळ मिळेल, अशी कारणे सांगितली जात आहेत. त्यामुळे आता शरद पवार हे काय निर्णय घेतात याकडे राजकीय वर्तूळाचे लक्ष लागले आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढविणार आहे. याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर सकारात्मक चर्चाही झाली आहे. त्यातच माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक तिसऱ्या टप्प्यात होत असून अजून त्याला अवकाश आहे. काॅंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीबरोबरच रासपच्याही उमेदवाराची घोषणा होईल. - महादेव जानकर, माजी मंत्री व अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmadha-acमाढाlok sabhaलोकसभाMahadev Jankarमहादेव जानकर