शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

लसीकरण केंद्रे प्राथमिक शाळांत स्थलांतरित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:40 IST

कोरेगाव : सध्या सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस घेण्यामध्ये स्वारस्य आहे. त्यामुळे सर्वच लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी आहे. आरोग्य विभागाच्या ...

कोरेगाव : सध्या सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस घेण्यामध्ये स्वारस्य आहे. त्यामुळे सर्वच लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी आहे. आरोग्य विभागाच्या सर्वच यंत्रणा एकाच छताखाली असल्याने, तेथे भल्या पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत गर्दी असते, त्यातूनच कोरोना वाढत चालला आहे. कोरोना सुपर स्प्रेडर बनत असल्याने लसीकरण केंद्रे तातडीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्थलांतरित करावीत, अशी मागणी आमदार महेश शिंदे यांनी केली आहे.

कोरेगाव मतदारसंघातील कोरोनाविषयक भीषण परिस्थिती त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली. यावेळी सुनील खत्री, संतोष आबा जाधव, राहुल प्र. बर्गे, माजी नगराध्यक्ष प्रशांत ऊर्फ राजाभाऊ बर्गे उपस्थित होते.

आ. शिंदे म्हणाले, विविध रुग्णालयांत उपचारार्थ दाखल होणार्‍या रुग्णांची माहिती घेतल्यावर, त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि ट्रॅव्हल हिस्ट्री पाहिली, तर त्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेतल्याचे स्पष्ट झाले. याबाबत शासनाच्या जबाबदार अधिकार्‍यांसह जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी संपर्क साधून वस्तुस्थिती विषद केली. मात्र, त्यांनी शासन निर्णयाकडे बोट दाखविले. त्यानंतर, मी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये हा विषय मांडला. त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन दाखविला आहे. मात्र, प्रशासन म्हणाव्या त्या पद्धतीने आणि अपेक्षित गतीने काम करत नाही.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या का आहे, ही बाब मी स्वत: पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना निदर्शनास आणून दिली आहे. केवळ नेरच नव्हे, तर वेटणे, एकंबे, कण्हेरखेड, किन्हई, कुमठे, चिमणगाव या परिसरातही हीच परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे. एकूणच आरोग्य विभाग आपलेच म्हणणे खरे करत असून, त्यातून अनेक निष्पापांचा जीव जात आहे, असा आरोप आ. शिंदे यांनी केला.

सद्यस्थितीत सर्वच निर्णयाचे अधिकार हे शासकीय अधिकार्‍यांकडे आहेत. ते ग्रामीण भागात जात नाहीत. ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी हे देखील फिरकत नाहीत. आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका प्रामाणिकपणे काम करत आहेत. मात्र त्यांनाही मर्यादा आहेत. त्यामुळे आम्ही आता ग्रामीण भागात कोरोनाला रोखण्यासाठी स्वत: पुढाकार घेतला आहे. बोरजाईवाडीतून त्याचा प्रारंभ केला असून, ग्रामपंचायतीत बैठक घेऊन राजकारणविरहीत वॉर्डस्तरीय समित्यांची स्थापना केली आहे. प्रत्येक सदस्याला बरोबर घेत कोंबिंग ऑपरेशन सुरू केले आहे. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी झाल्यावर कोरोनाचा वेग निश्‍चितपणे कमी होईल, असा विश्‍वास आ. शिंदे यांनी व्यक्त केला.

(चौकट)

लस घेणार नाही.. घेऊ देणार नाही

जोपर्यंत आरोग्य केंद्राच्या इमारतीतून लसीकरण केंद्र बाहेर जिल्हा परिषद शाळेत स्थलांतरित करत नाहीत, तोपर्यंत आम्ही युवक कार्यकर्ते लस घेणार नाही. आमदार महेश शिंदे यांनी लसीकरण केंद्रांबाबत घेतलेली भूमिका योग्य आहे. जोपर्यंत प्रशासन या भूमिकेशी अनुसरुन निर्णय घेत नाही, तोपर्यंत आम्ही लस घेणार नाही आणि कोणालाही घेऊ देणार नाही. ग्रामीण भागातही तसाच प्रचार करणार असून, त्यातून कोणतीही दुर्घटना घडल्यास त्यास प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील, असा इशारा नीलेश नलवडे, संतोषआबा जाधव, संजय काटकर, संदीप केंजळे, श्रीकांत बर्गे, जवानसिंग घोरपडे, पंकज गोडसे यांच्यासह युवक कार्यकर्त्यांनी दिला आहे.