शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

Priyanka Mohite: साताऱ्याच्या प्रियांका मोहितेने सर केलं जगातील तिसरे उंच कांचनगंगा शिखर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 18:49 IST

सातारा : साताऱ्याची गिर्यारोहक प्रियांका मंगेश मोहिते हिने जगातील तिसरे सर्वात उंच असलेले कांचनगंगा शिखर सर केले आहे. प्रियांकाने ...

सातारा : साताऱ्याची गिर्यारोहक प्रियांका मंगेश मोहिते हिने जगातील तिसरे सर्वात उंच असलेले कांचनगंगा शिखर सर केले आहे. प्रियांकाने ही मोहिम आज, गुरुवारी सायंकाळी चार वाजून ५२ मिनीटांनी फत्ते केली. तिच्या या यशस्वी मोहिमेनंतर तिच्या कुटुंबियांनी व साताऱ्यातील क्रीडाप्रेमींनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.तेनजिंग नोर्गे नॅशनल अॅडव्हेंचर अवॉर्ड २०२० प्राप्त करणाऱ्या प्रियांका मोहितेने आज, गुरुवारी ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली. यानंतर तिने बेस कॅम्पवर उतरण्यास सुरुवात केली आहे. लवकरच ती भारतात परतणार असल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली.

अन्नपूर्णा शिखर सर करणारी पहिली महिलाअन्नपूर्णा शिखर सर करणारी ती पहिली भारतीय महिला होती. कांचनजंगा माऊंटवरील यशानंतर प्रियंका ८००० मीटरपेक्षा जास्त उंचीची ५ शिखरे सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली असल्याचा दावा तिच्या कुटुंबियांनी केला आहे.माउंट एव्हरेस्ट व के-२ यांच्यानंतरचे सर्वात उंच शिखरकांचनगंगा हे हिमालय पर्वतांतील एक उंच पर्वतशिखर आहे. हे जगातील माउंट एव्हरेस्ट व के-२ यांच्यानंतरचे तिसरे सर्वात उंच शिखर असून भारताच्या सिक्कीम राज्यात आहे. याची उंची ८,५८६ मी (२८,१६९ फूट) इतकी आहे. कांचनजंगा शिखर सर करण्यात महाराष्ट्रातून पुण्याचा गिर्यारोहक हर्षद राव हा पहिला ठरला होता.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर