शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

डोंगर उताराला भात लागणी जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 15:19 IST

शेतकरी व्यस्त : बियाणांची किंमत वाढल्याने नाराजी

आॅनलाईन लोकमतचाफळ (जि. सातारा), दि. २२ :चाफळ विभागात गत आठ दिवसापासुन पडत असलेल्या संततधार पावसामुळे खरीपाची पेरणी केलेल्या पिकांची वाढ चांगल्या पद्धतीने झाली आहे. विभागात सर्वत्र पडत असलेल्या पावसामुळे डोंगर उतारावरुन येणारे पाणी आडव्या पाटाकडे वळवुन पाडळोशी, केळोलीसह परीसरातील शेतकऱ्यांनी रखडलेल्या भात लागणीस सुरूवात केली आहे.डोंगराळ व दुर्गम विभाग म्हणुन चाफळ विभागाकडे पाहिले जाते. विभागात डेरवण पाझर तलाव व उत्तरमांड धरणाची उभारणी झाली असली तरी आजही बहुतांश शेती कोरडवाहु व पुर्णत: पावसावर अवलंबुन आहे. गत महिनाभरापासुन मान्सुनच्या पावसाने विभागाकडे पाठ फिरवली होती. मात्र, गत आठ दिवसापासुन विभागात पावसाची रिपरिप सुरु झाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे. विभागाच्या पश्चिमेकडील धायटी, पाडळोशी, केळोली, विरेवाडी, पाठवडे , दाढोली आदी अनेक गावात सध्या भात लागणीची कामे सुरु आहेत. या विभागातील शेती डोंगर उताराची असल्याने येथील शेतकरी भात लागवड जास्त प्रमाणात करतात. गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी भात बियाणांच्या किंमतीत शंभर रुपयाने वाढ झाल्याने शेतकऱ्यांना आर्थीक भूर्दंड सहन करावा लागत आहे. विभागात सध्या गंगा कावेरी, इंद्रायणी, भोगावती, तृप्ती आदी भात वाणांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. मान्सुनच्या सुरुवातीला पडलेल्या तुरळक पावसावर येथील शेतकऱ्यांनी शेतामध्ये तरवे टाकले होते. परंतु त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेकऱ्यांची भात लागन धोक्यात आली. सध्या उशिरा का होईना दमदार हजेरी लावल्याने रखडलेल्या भात लागणींच्या कामाला वेग आला आहे. सध्या विभागातील शेतकरी आपल्या बैल जोडीच्या सहाय्याने शेतात चिखल करुन भात लागवड करताना दिसून येत आहेत. विभागात गत काही वषार्पासुन पारंपारीक पध्दतीने भात लागवड न करता कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली लागवड केली जात होेती. परंतु सध्या विभागातील शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कृषी खात्याचे कर्मचारी पोहचु न शकल्याने शेतकऱ्यांतून तिव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असुन कृषी विभागाच्या मार्गदर्शनाविनाच चालु वर्षी शेतकरी भात लागवड करताना दिसुन येत आहेत.गतवर्षीच्या तुलनेत भात बियाणांच्या किंमतीत सहा किलो मागे तब्बल शंभर रुपयांची वाढ झाली आहे. गतवर्षी गंगाकावेरीच्या सहा किलो पिशविचा दर ७५० रुपए होता. आता हे बियाणे ८५० रुपयाला आहे. तर इंद्रायणी गेल्यावर्षी ६ किलो हजार रूपयाला होते. आता त्यामध्ये वाढ होऊन सहा किलोचा दर १ हजार २०० रुपए झाला आहे. तृप्ती बियाणे २०० रूपयाला होते आता ३०० रुपयाला झाले आहे. तर भोगावती बियाणे ६५० ला होत. ते ८६० रुपयाला विकत घ्यावे लागत आहे. शासनाने जीएसटीची नविन करप्रणाली लागु केल्याने ही दरवाढ झाल्याचे दुकानदार सांगत आहेत.- राजाराम पवार, शेतकरी