शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मुलाला वाचविताना आईचा शॉक लागून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 17:28 IST

मुलाला शॉक लागल्याने त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या आईचा शॉग लागून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना खंडाळा तालुक्यातील सुखेडमधील पडळकर वस्तीवर रविवारी दुपारी चारच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देमुलाला वाचविताना आईचा शॉक लागून मृत्यूसुखेड येथील घटना : वीजवितरणवर आरोप

लोणंद : मुलाला शॉक लागल्याने त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या आईचा शॉग लागून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना खंडाळा तालुक्यातील सुखेडमधील पडळकर वस्तीवर रविवारी दुपारी चारच्या सुमारास घडली.दिपाली संतोष पडळकर (वय ३२) असे शॉक लागून मृत्यू झालेल्या दुर्देवी मातेचे नाव आहे. हा प्रकार वीज वितरणच्या भोंगळ कारभारामुळे झाला असल्याचा आरोप पडळकर कुटुंबीयांनी केला आहे.याबाबत अधिक माहिती अशी, पडळकर यांच्या घरातील वीजेची जोडणी वायरमनने या घटनेच्या काही तासांपूर्वी केली होती. परंतु तरीही संपूर्ण इमारतीस शॉक बसत होता. दिपाली व त्यांचा मुलगा दुपारच्या सुमारास टेरेसवर गेले होते. त्यावेळी खेळताना मुलगा शुभमला अचानक शॉक लागला.

हा प्रकार दिपाली यांच्या लक्षात येताच त्यांनी शुभमला सोडविले. मात्र, त्यांना जोरदार विजेचा झटका बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घरातील वीज कनेक्शन चुकीचे जोडल्यामुळे ही घटना घडली असल्याचा आरोप बाळकृष्ण पडळकर यांनी केला आहे. या घटनेची लोणंद पोलीस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून नोंद करण्यात आली आहे.गुन्हा दाखल करण्याची मागणी..या भागात सतत कमी दाबाने वीज पुरवठा होतो. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सांगूनही या ठिकाणी नवीन डीपी बसविण्यात येत नाही. दिपालीच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर