शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

मुलाकडून आई व मामाचा भाल्याने भोसकून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 14:56 IST

बोरकरवाडी, (ता. फलटण) येथे मुलाने आई आणि मामाचा भाल्याने भोसकून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री घडली. चोरीचा आळ घेतल्याच्या संशयातून ही भयानक घटना घडली आहे. आई आशीबाई भोसले (वय ५५), मामा नमन्या हचल पवार (वय २८, रा. बोरकरवाडी, ता. फलटण) असे खून झालेल्यांची नावे आहेत.

ठळक मुद्देमुलाकडून आई व मामाचा भाल्याने भोसकून खूनचोरीचा आळ घेतल्याचा संशय : आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना

सातारा : बोरकरवाडी, (ता. फलटण) येथे मुलाने आई आणि मामाचा भाल्याने भोसकून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री घडली. चोरीचा आळ घेतल्याच्या संशयातून ही भयानक घटना घडली आहे.आई आशीबाई भोसले (वय ५५), मामा नमन्या हचल पवार (वय २८, रा. बोरकरवाडी, ता. फलटण) असे खून झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बोरकरवाडी येथे घराजवळ रात्री दहाच्या सुमारास आई आशीबाई आणि मामा नमन्या हे दोघे गप्पा मारत बसले होते. त्यावेळी त्या ठिकाणी आशीबाई भोसले यांचा मुलगा गबऱ्या रमेश भोसले हा त्याचे साथीदार अरूण झबझब्या पवार, संपूबाइृ भोसले, चोच्या राज्या शिंदे, शबनम राजा शिंदे हे चारचाकी गाडीतून आले. माझ्यावर चोरीचा आळ घेताय, असे म्हणत गबऱ्या भोसले याने त्याच्या हातातील लाकडी भाल्याने आशीबाई भोसले हिच्या गळ्यावर तर नमन्या पवार याच्या पोटात भोसकून त्यांना गंभीर जखमी केले.

या घटनेची माहिती मिळताच लोणंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या आशीबाई भोसले आणि नमन्या पवार यांना फलटण येथील रुग्णालयात नेण्यात आले.

मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. संशयित आरोपी गबऱ्या भोसले हा सुद्धा या वादावादीत जखमी झाला असून, तो फरार झाला आहे. लोणंद पोलिसांनी दोन पथके तयार करून आरोपींच्या शोधासाठी रवाना केली आहेत.

टॅग्स :MurderखूनSatara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी