शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

पाटणमध्ये सर्वात जास्त अवघड क्षेत्रातील शाळा

By admin | Updated: April 12, 2017 15:20 IST

हरकतींसाठी सात दिवसांची मुदत : सातारा तालुक्यात केवळ १४ शाळांची नोंद

आॅनलाईन लोकमतसातारा, दि. १२ : शिक्षक बदलीच्या अनुषंगाने अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्र अशा परिसरातील शाळांच्या याद्या प्रशासनाने तयार केल्या आहेत. त्यामध्ये पाटण तालुक्यातील २२६ इतक्या सर्वात जास्त शाळा अवघड क्षेत्रात नोंदल्या गेल्या आहेत. तर माण तालुक्यातील केवळ ९ शाळांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील २ हजार ७१६ शाळांपैकी तब्बल ५२८ शाळा या दुर्गम (अवघड) क्षेत्रात असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने सोमवारी जाहीर केले. उर्वरित २ हजार १८८ शाळा सुगम (सर्वसाधारण) क्षेत्रात असणार आहेत. त्यानुसारच शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.शासनाने १५ मे २०१४ रोजी शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांबाबत शासन आदेश काढला आहे. या आदेशानुसार जिल्ह्यातील सुगम व दुर्गम गावे निश्चित करण्याचे काम सुरू असून, सुगम भागातील जास्तीत जास्त गावे दुर्गम प्रकारात बसावीत, यासाठी शिक्षक मंडळींनी राजकीय फिल्डिंग लावल्याची जोरदार चर्चा होती.शिक्षकांच्या बदल्या तालुक्यांतर्गत होत होत्या. शासनाच्या नव्या आदेशानुसार आता शिक्षकांच्या बदल्यांचे धोरण जिल्हा स्तरावरून ठरणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या बदल्यांचे पूर्ण अधिकार असणार आहेत. ज्या शिक्षकांनी दहा वर्षे व त्यापेक्षा जास्त अधिक काळ सुगम भागात सेवा बजावली आहे, त्यांची बदली दुर्गम भागात केली जाणार आहे. तर ज्या शिक्षकांनी दुर्गम भागात ३ वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा बजावली आहे, त्या शिक्षकांना सुगम भागात सेवा बजावण्याची संधी मिळणार आहे.

दरम्यान, येत्या सात दिवसांत या याद्यांवर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव यांच्याकडे हरकती नोंदविता येणार आहेत. त्यानंतर पाच दिवस पुढे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे हरकती नोंदविता येतील. त्यानंतर शिक्षक बदल्यांची कार्यवाही केली जाणार आहे. (प्रतिनिधी)याद्या सोशल मिडियातून व्हायरलअवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्रातील गावांच्या तालुकानिहाय याद्या सोशल मिडियावरुन व्हायरल होऊ लागल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवरही या याद्या पाहायला उपलब्ध असल्याने बदलीच्या प्रतीक्षेत असणारे शिक्षक आॅनलाईन बिझी झाले आहेत. माण : ८खटाव : ९पाटण : २२६फलटण : १९सातारा : १४कोरेगाव : १३महाबळेश्वर : ११०वाई : ३६खंडाला : १०जावळी : १९०कऱ्हाड : १३