शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

महामार्ग पोलिसांच्या ताफ्यात आधुनिक वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 00:29 IST

सातारा : महामार्ग पोलिसांच्या ताफ्यात आता अत्याधुनिक वाहने दाखल झाली आहेत. आता बेदरकारपणे वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करणे पोलिसांना ...

सातारा : महामार्ग पोलिसांच्या ताफ्यात आता अत्याधुनिक वाहने दाखल झाली आहेत. आता बेदरकारपणे वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करणे पोलिसांना सोपे जाणार आहे. महामार्गावर ही वाहने ‘वॉच’ ठेवणार आहेत.महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाकडून सातारा जिल्ह्यातील महामार्ग पोलीस केंद्र भुर्इंज व महामार्ग पोलीस केंद्र कºहाड यांना अत्याधुनिक सुविधांनी सज्ज वाहने प्राप्त झाली. पोलीस अधीक्षक कार्यालय सातारा येथे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी या वाहनांची पाहणी करून यामधील विविध उपकरणांची माहिती करून घेतली. महामार्ग पोलिसांना नमूद वाहनांच्या वापराबाबत मार्गदर्शन करून अधिक प्रभावीपणे कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या. यावेळी भुर्इंज महामार्ग पोलीस केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव, सहायक पोलीस निरीक्षक माने तसेच कºहाड महामार्ग पोलीस केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक कलके व महामार्ग पोलीस विभागाचे कर्मचारी हजर होते.वाहनांमध्ये मद्यधुंद वाहनचालकांची चाचणी घेण्यासाठी ‘ब्रेद अ‍ॅनालायझर’ मशीन उपलब्ध असणार असून, जे वाहनचालक मद्यसेवन करून वाहन चालवताना आढळून येतील, त्यांची जागेवरच या उपकरणाच्या साह्याने चाचणी करून दोषी आढळल्यास त्या वाहनचालकांवर मोटार वाहन कायदा १९८८ कलम १८५ प्रमाणे कोर्टात खटला दाखल करण्यात येणार आहे.या अत्याधुनिक वाहनांमध्ये लेझर स्पीडगन बसवण्यात आली असून, या लेझर स्पीडगनच्या साह्याने राज्य, राष्ट्रीय महामार्गावर वेग मर्यादेचे उल्लंघन करून वाहन चालवणाºया सर्व प्रकारच्या वाहनचालकांवर मोटार वाहन कायदा १९८८ कलम १८३ प्रमाणे कठोर कारवाई करण्यात येणार आहे. या वेग मर्यादेबद्दल अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) विनय कारगावकर यांनी दि. २५ नोव्हेंबर रोजी अधिसूचना काढलेली असून, या अधिसूचनेनुसार सोमवारपासून कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे.‘टिंटोमीटर’ हे मशीनही या वाहनांमध्ये उपलब्ध असून, त्याद्वारे वाहनांवर काळी फिल्म काच असणाºया वाहनांवर केंद्र्रीय मोटार वाहन अधिनियम १९८९ नियम १०० (२) प्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे वाहतूक विभागास प्राप्त ई-चलन मशीनच्या साह्णाने महामार्गावर लेन कटिंग करणाºया, महामार्गाच्या उजव्या बाजूने अवजड वाहन चालवणाºया वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.