पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेकडील कास येथील दोन तरुणांनी सापडलेला पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल संबंधित पर्यटक युवतीला खातरजमा करून परत केला.
कास परिसरात रविवारी बहुतांश पर्यटकांनी हजेरी लावली. पर्यटनास आलेल्या सातारा शहरातील श्रुती शिंदे हिचा कास धरण परिसरात पडलेला मोबाईल कास गावचे रहिवाशी शुभम किर्दत व अभिषेक शेलार यांना सापडला. सापडलेला मोबाईल संबंधित पर्यटकाला मिळाला पाहिजे या प्रामाणिकतेने कास धरण परिसरात मोबाईलला रेंज नसल्याने या तरुणांनी मोबाईल कास पुष्पपठारावर नेला. मोबाईल रेंजमध्ये नसल्याने हरवलेल्या मोबाईलची आशा सोडून कुटुंबासमवेत माघारी घराकडे निघालेल्या श्रुतीने काही काळानंतर फोन केल्यावर रेंजमध्ये घेऊन आलेल्या या तरूणांना फोन आला. दरम्यान, फोन आम्हाला सापडला आहे असे सांगून माघारी आलेल्या श्रुतीचाच हा फोन आहे याची खातरजमा करून या युवतीला मोबाईल सुपूर्द केला.