शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

माउलींची वारी मोबाईल अ‍ॅपवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 22:14 IST

लोणंद : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुण्याहून मार्गस्थ झाला असून, शुक्रवार, दि. १३ रोजी वैष्णवांचा मेळा लोणंद मुक्कामी येत आहे. माउलींचा सातारा जिल्ह्यातील लोणंद या ठिकाणी पहिलाच मुक्काम असल्याने प्रशासन सज्ज झाले आहे. दरम्यान, वारीच्या नियोजनासाठी जिल्हा प्रशासनाने ‘आषाढी वारी २०१८’ मोबाईल अ‍ॅप विकसीत केले असून, याद्वारे भाविकांना सर्व ...

लोणंद : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुण्याहून मार्गस्थ झाला असून, शुक्रवार, दि. १३ रोजी वैष्णवांचा मेळा लोणंद मुक्कामी येत आहे. माउलींचा सातारा जिल्ह्यातील लोणंद या ठिकाणी पहिलाच मुक्काम असल्याने प्रशासन सज्ज झाले आहे. दरम्यान, वारीच्या नियोजनासाठी जिल्हा प्रशासनाने ‘आषाढी वारी २०१८’ मोबाईल अ‍ॅप विकसीत केले असून, याद्वारे भाविकांना सर्व माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.लोणंद येथे झालेल्या आढावा बैठकीत सूचना केल्याप्रमाणे सर्वच विभागांच्या कामांना गती मिळाली आहे. लोणंद शहरातील कचरा, गटारांची सफाई, रस्त्याकडेची झुडपे, बाभळी काढणे, वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी लोणंद व परिसरातील मोकळ्या जागांची स्वच्छता करणे, पावसामुळे चिखल होणाºया भागात मुरुम टाकणे तसेच पालखी मार्गावरील रेल्वे पुलाची स्वच्छता करण्यात आली आहे.पाणीपुरवठा विभागातर्फे पिण्याच्या पाण्याचे टँकर भरण्याकरिता तीन फिलिंग पॉर्इंट तयार करण्यात आले आहेत. तसेच नगरपंचायत हद्दीतील सर्व खांबांवरील दिव्यांची तपासणी करण्यात आली आहे. पालखी तळावर माउलींच्या स्वागतासाठी स्वागत कमानी उभारण्यात आल्या असून, त्या ठिकाणी चौदा हायमास दिव्यांचे मनोरे उभारण्यात आले आहेत. दर्शन रांगेसाठी बॅरिगेट्स उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे.आषाढी वारी २०१८...यावर्षीच्या वारीच्या नियोजनासाठी व भाविकांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने ‘आषाढी वारी २०१८’ मोबाईल अ‍ॅप भाविकांसाठी उपलब्ध करून दिले आहे. यामध्ये वारकरी व भाविकांच्या मदतीसाठी संपर्क क्रमांक, वारीचा दिनक्रम, कोणत्या ठिकाणी भाविकांना सोयी-सुविधा उपलब्ध आहेत, याची माहिती या अ‍ॅपमध्ये समाविष्ठ करण्यात आले आहे.वारकºयांसाठी स्वच्छ व मुबलक पाणी.‘निर्मलग्राम’तर्फे ६५० स्वच्छतागृह उपलब्ध केले आहेत.पालखी मार्गासह विजेची सोय करण्यात आली आहे.रुग्ण वाहिका, अग्निशमन, आरोग्य पथके तैनात.भाविकांच्या सुरक्षेसाठी वॉकी-टॉकी.