शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

"शिवसेनेच्या बोटाला धरून भाजपा मोठी झाली; चंद्रकांत पाटलांनी नैराश्येतून बोलणं टाळावं, अन्यथा..."

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2021 12:17 IST

माझ्याच जिल्ह्यात येवून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शिवसेनेवर टीका करत असतील तर ते मी कदापि खपवून घेणार नाही. कोणताही आधार नसताना वक्तव्य करणे चुकीचे आहे.

सातारा : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, शिवसेनाप्रमुख उद्धवसाहेब यांच्या बोटाला धरुनच भाजपा महाराष्ट्रात मोठी झाली आहे. चंद्रकांत पाटील यांनी नैराश्येतून वक्तव्य करणे टाळावे अन्यथा त्यांचा गावागावात शिवसैनिक समाचार घेतील, असा सुचक इशाराच राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत लगावला.

शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, माझ्याच जिल्ह्यात येवून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शिवसेनेवर टीका करत असतील तर ते मी कदापि खपवून घेणार नाही. कोणताही आधार नसताना वक्तव्य करणे चुकीचे आहे. भाजपच्यावतीने अनेक तारखा महाविकास आघाडीचे सरकार पडण्याबाबत त्यांनी दिल्या. कधी दोन महिन्याच्या तर कधी दोन वर्षांच्या. पण मुख्यमंत्री उद्धवसाहेब हे आमचे नेतृत्व कणखर आणि अभ्यासू आहे. अनेक संकट आली त्या संकटात आली. त्या संकटाला आम्ही धीराने सामना केला. चंद्रकांत पाटील यांनी नैराश्येतून वक्तव्य करणे टाळावे, तुमच्या भाजपचेही केवळ दोनच खासदार होते सुरुवातीला. इतर पक्षांची जवळीक त्यावेळी करून सरकार केले होते हे विसरला काय?आज प्रमोद महाजन नाहीत, गोपीनाथ मुंडे नाहीत त्यांनी भाजपसाठी मेहनत घेतली. लालकृष्ण अडवाणी साहेब आहेत त्यांना चंद्रकांत पाटलांनी विचारावे की हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बोटाला धरुनच महाराष्ट्रात गाव पातळीवर भाजपा पोहचली आहे. निवडणुकीवेळी युतीधर्म शिवसेनेने पाळला होता. त्यानंतर भाजपने युती धर्म पाळला नाही हेही त्यांनी तपासावे, अशी टीप्पणी केली.

एसटी कर्मचा-यांना ४१ टक्के पगारवाढ दिली आहे. तरीही कर्मचारी कामावर येत नसतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. तिथे एखादी संघटना म्हणून कारवाईमध्ये दुजाभाव केला जाणार नाही. एसटी कर्मचाऱ्यांनी आता कामावर यावे, लोकांना सेवा द्यावी, असे आवाहन शंभूराज देसाई यांनी केले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShambhuraj Desaiशंभूराज देसाईBJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटीलShiv Senaशिवसेना