शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Satara Politics: शंभूराज देसाई अस्वस्थ; म्हणे 'उद्या मुंबईत माझी परीक्षा'!

By प्रमोद सुकरे | Updated: June 10, 2024 12:19 IST

पाटण विधानसभा मतदार संघातील कमी मतदान जिव्हारी

प्रमोद सुकरेकऱ्हाड : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पाटण विधानसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवाराला मिळालेली कमी मते पाटणचे शिवसेनेचे आमदार, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या चांगलेच जिव्हारी लागलेले दिसत आहे.म्हणून तर शनिवारी कार्यकर्यांच्या मेळाव्यात   बोलताना मला मंत्रीपदातून मुक्त करा असे मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे जाहीर वक्तव्य त्यांनी केले. तर रविवारी मतदार संघातीलच मल्हारपेठ येथे एका पुस्तक प्रकाशन समारंभात मी हे पुस्तक वेळ मिळाला की वाचून प्रतिक्रिया देतो पण आता जातो कारण माझी उद्या मुंबईत परिक्षा आहे. बघतो आता पेपर कसा आहे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीने चांगले यश संपादन केले आहे. सातारा जिल्ह्यात महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले विजयी झाले असले तरी त्यांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण विधानसभा मतदारसंघातच सुमारे २ हजार ९०० मते कमी आहेत. ही बाब जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याच्या मंत्रिमंडळातील एक जबाबदार मंत्री म्हणून शंभूराज देसाई यांना कमीपणाची मानली जात आहे.वास्तविक मंत्री शंभूराज देसाई यांनी निवडणूक प्रचारात मतदारसंघात प्रचार करताना मी स्वतः निवडणुकीला उभा आहे असे समजा, चांगले मताधिक्य द्या, मला कमीपणा देऊ नका अशी साद आपल्या कार्यकर्त्यांना प्रचार सभेमधून घातली. पण प्रत्यक्षात निकालानंतर दस्तूर खुद्द पालकमंत्र्यांच्याच विधानसभा मतदारसंघात उमेदवाराला कमी मते मिळाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मंत्री देसाई अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे.त्याचीच प्रचिती गेले दोन दिवस ते कार्यक्रमातून बोलताना येत आहे.त्यांच्या विधानांनी तालुक्यातील जनतेत उलट सुलट चर्चा सुरू आहेत.शनिवारी पाटण तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या घेतलेल्या मेळाव्यात लोकसभा निवडणुकीत मतदार संघात मिळालेल्या मतांचा मंत्री देसाई यांनी आढावा घेतला. आता मी माझ्या मतदार संघात युतीच्या उमेदवाराला कमी पडलेल्या मतांची जबाबदारी स्विकारुन मला राज्याच्या मंत्रिमंडळातून मुक्त करावे अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचे सांगून कार्यकर्त्यांना धक्का दिला. त्यामुळे मंत्री देसाई आता काय करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.रविवारी दुपारी मतदारसंघातील मल्हारपेठ येथे प्रदिप पाटील यांच्या 'दुर्गजिज्ञासा ' या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला मंत्री देसाईंनी धावती हजेरी लावली.पुस्तक प्रकाशन होताच मला बोलू द्या मला पुढे जायचे आहे असे म्हणत देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्ह्यातील गडांचा अभ्यास करणारे 'दुर्गजिज्ञासा' हे पुस्तक चांगले आहे. त्याचे वाचन करून मी माझी प्रतिक्रिया कळवितो. पण सध्या माझी घाई आहे. उद्या माझी मुंबई परीक्षा आहे. पेपर कसा येतो ते जरा बघतो असे सांगत त्यांनी सर्वांचा निरोप घेतला.मते देताना हे लोक कोठे असतात हे समजत नाही पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला यायला उशीर झाला त्याबद्दल सुरुवातीलाच मंत्री देसाईंनी दिलगिरी व्यक्त केली. पण त्याचे कारण सांगताना मतदार संघातील लोकांसाठी आयोजित जनता दरबार मध्ये जास्त गर्दी होती असे सांगितले. निवडणुकीला मते कमी पडली तरी  जनता दरबाराची गर्दी कमी होत नाही. मते देताना हे लोक कुठे असतात ते समजत नाही असेही ते म्हणाले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShambhuraj Desaiशंभूराज देसाईPoliticsराजकारण