सातारा : जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे कोरोनाबाधित झाले आहेत. त्यांच्यावर सध्या गृहविलगीकरणात उपचार सुरू आहेत.पालकमंत्री देसाई यांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीत त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. माझी प्रकृती चांगली आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी काही लक्षणे जाणवल्यास कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री देसाई यांनी केले आहे.
मंत्री शंभूराज देसाई कोरोनाबाधित, गृहविलगीकरणात उपचार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 14:42 IST