सातारा : कामगार हिताचे अनेक प्रश्न तातडीने मार्गी लागावा. आठ दिवसांत कामगारांचे प्रश्न समजावून घेऊन ते त्वरित मार्गी लावावेत कामगारांवर अन्यायकारक भूमिका अधिकाऱ्यांनी घेऊ नये नाहीतर गाठ माझ्याशी आहे, असा सज्जड दम मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला.
एसटी कामगार प्रश्नांबाबत काही अधिकारी अन्यायकारक भूमिका घेत आहेत. या संदर्भात एसटी कामगार सेनेचे जिल्हा अध्यक्ष रणजितसिंह भोसले व संघटनेचे सर्व विभागीय पदाधिकारी यांनी याबाबत महाराष्ट्र राज्याचे ड्याशिंग मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे तक्रार केली त्यावेळी मंत्रीमहोदय यांनी विभागनियंत्रक व संबंधित अधिकाऱ्यांची तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली.
या बैठकी वेळी एसटी कामगार सेनेचे जिल्हा प्रमुख रणजितसिंह भोसले उपाध्यक्ष रामभाऊ रैनाक, कार्याध्यक्ष शिवाजी देसाई प्रमुख सल्लागार पी. एस. सपकाळ सहसचिव पावन फाळके भारतीय विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख संभाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो आवश्यक असेल तर घेणे