शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

..अन् गृह राज्यमंत्र्यांनीच घातली काॅलेजच्या प्रवेशद्वारावर गस्त, पोलिसांनी १६ तरुणांना घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 12:50 IST

सातारा : शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मुलींच्या छेडछाडीचे आणि वादावादीचे प्रकार घडत असल्याने गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी ...

सातारा : शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मुलींच्या छेडछाडीचे आणि वादावादीचे प्रकार घडत असल्याने गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी बुधवारी दुपारी अचानक काॅलेजच्या प्रवेशद्वाराजवळ पोलिसांसोबत गस्त घातली. त्यावेळी महाविद्यालय परिसरात विनाकारण रेंगाळणाऱ्या १६ युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अचानक गृहमंत्रीच काॅलेज परिसरात आल्याने महाविद्यालयीन युवकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली.सातारा शहरामध्ये काॅलेजच्या प्रवेशद्वाराजवळ गेल्या काही दिवसांपूर्वी तुंबळ हाणामारी झाली होती. एकमेकांचा पाठलाग करत महाविद्यालयीन युवक एका दुकानात घुसले होते. यामध्ये दुकानाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. तसेच, महाविद्यालयात जात असताना एका तरुणीचा विनयभंगही करण्यात आला होता. 

या साऱ्या प्रकाराला आळा घालण्यासाठी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी बुधवारी काही मोजक्याच पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेतलं. वायसी काॅलेज, डीजी आणि छत्रपती शिवाजी महाराज काॅलेजवर अचानक गस्त घातली. नेमकं याचवेळी काॅलेज सुटलं होतं.काही रोडरोमिओ ये-जा करणाऱ्या मुलींकडे पाहात होते. तर काहीजण मोटारसायकलवर टेकून उभे होते. अशा १६ तरुणांची पोलिसांनी धरपकड करून त्यांना पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले. 

साध्या वेशात पोलीस असल्यामुळे मुलांना नेमक काय चाललं, हे बराचवेळ समजलं नाही. पण जेव्हा पाठलाग करून मुलांची धरपकड पोलीस करू लागले तेव्हा मात्र, मुलांना पोलीस आले असल्याची जाणीव झाली. अशा प्रकारे अचानक गृह मंत्र्यांनी पोलिसांसोबत गस्त घातल्याने छेडछाड आणि वादावादीला आळा बसेल, असे महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी बोलून दाखविले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShambhuraj Desaiशंभूराज देसाईcollegeमहाविद्यालय