शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Satara: फलटण तालुक्यातील जनताही आता म्हणते ‘राजे चले जाव..’; मंत्री जयकुमार गोरे यांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 16:13 IST

..अन्यथा जेलमध्ये गेला असता

फलटण : स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधी यांना ‘सायमन, गो बॅक’ चळवळ उभी करावी लागली. तसे आता फलटण तालुक्यातील जनता म्हणतेय ‘राजे, चले जाव.’ जुलमी राजवटीचा नायनाट झाला आहे. जनतेने वेगाने परिवर्तनाची लाट आणली आहे, यामुळे रामराजेंनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, असा घणाघात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केला.फलटण येथे रविवारी झालेल्या व्यापारी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, अभिजीत नाईक-निंबाळकर, जयकुमार शिंदे, सुदामराव मांढरे, विश्वासराव भोसले, विलासराव नलावडे, फलटण तालुकाध्यक्ष अमित रनवरे, बापूराव शिंदे, बजरंग गावडे, रणजितसिंह भोसले उपस्थित होते.मंत्री गोरे म्हणाले, विकासकामे करण्यासाठी कोणालाही बरोबर घेतले नाही. आम्ही नीरा देवधरसाठी संघर्ष केला, कोणीही वाईट चिंतून उपयोग नाही. कटकारस्थाने जास्त काळ टिकत नाहीत. मला तुरुंगात टाकताना त्यांना आसुरी आनंद होत होता. तो तात्पुरता होता. दारात पोलिस उभे राहिले तेव्हा कळले असेल की, हे वाचण्याच्या पात्रतेचे नाहीत. त्यांनी सर्वांचे पाय धरले. मी कोणाचीही मदत मागितली नाही.माजी खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, फलटणच्या परिवर्तनात जयकुमार गोरे यांचा सिंहाचा वाटा आहे. ग्रामपंचायतीसाठी निधी दिला आहे, क्रीडासंकुलाला निधी दिला. १०० गावांत ग्रामीण भागातील रस्ते, १५६ गावांत निधी मिळाला आहे. जुलमी राजवट उद्ध्वस्त करण्यासाठी व्यापाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कोणावरही अन्याय होऊ देणार नाही...अन्यथा जेलमध्ये गेला असतादेवेंद्र फडणवीस व मी त्यांना माफ केले, म्हणून ते तुरुंगात जायचे राहिले. नाहीतर जेलमध्ये गेला असता. बारामतीचा पाय चाटण्याची सवय इथे आणली त्यांनी दिल्लीचा मांत्रिक गाठला. लढायचे असेल, तर लढाई मर्दाची लढा बायकांना पुढे करून कोण लढते का?, मालोजीराजे यांचे नाव सांगता अन् असे वागता, असे म्हणत मंत्री जयकुमार गोरे यांनी रामराजेंवर टीकास्त्र डागले.