शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
3
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
4
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
5
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
6
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
7
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?
8
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
9
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
10
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
11
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
12
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
13
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
14
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
15
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
16
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
17
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
18
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
19
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
20
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?

मनोमिलन अन् आघाडीसुध्दा !

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

सोयीचे राजकारण : नेत्यांचेही कानावर हात; म्हणे... तुमचं तुम्ही बघा !

प्रमोद सुकरे - कऱ्हाड तालुक्याचं राजकारण प्रत्येक निवडणुकीत बदलताना पाहायला मिळते. सत्तेसाठी नेत्यांची वेगळी समीकरणं पाहायला मिळतात. त्याला मनोमिलन, मैत्रिपर्व अशी गोंडस नावंही दिली जातात; पण यातून कार्यकर्त्यांनीही आता बरेच शहाणपण घेतले आहे. त्याचेच प्रत्यंतर आता गावोगावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत येत असून, ग्रामस्थांनी काही ठिकाणी नव्याने मनोमिलन केलेलं दिसतंय तर काही ठिकाणी मैत्रिपर्व जपल्याचे पाहायला मिळत आहे. तर काही गावांत मतभेद बाजूला ठेवून आघाडीही झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतील पहिली पायरी म्हणजे ग्रामपंचायती ! ही पहिली पायरी आपणच यशस्वीपणे पार पाडावी यासाठी स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. आता अर्ज माघारीची मुदत संपल्याने उमेदवारांसह स्थानिक नेत्यांनी जोर बैठकांची गती वाढविली आहे. ४ आॅगस्टला ते एकमेकांना प्रत्यक्ष भिडणार आहेत. पण, गावच्या आखाड्यातील ही कुस्ती जिंकण्यासाठी सोयीचे राजकारण करत गावागावांत नवे मैत्रिपर्व, मनोमिलन पाहायला मिळाले आहे. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू अथवा मित्र नसतोच मुळी ! कऱ्हाड तालुक्यात तर प्रत्येक निवडणुकीला राजकारणाच वेगळे चित्र पाहायला मिळू लागले आहे. त्याला ग्रामपंचायत निवडणूकाही अपवाद नाहीत. राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे मोहिते अन् भोसले गट सात वर्षांपूर्वी एकत्र आले. त्याला ‘मनोमिलन’ असं नाव देण्यात आलं. त्यानंतर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी विलासराव पाटील-उंडाळकरांच्या विरोधात सर्वजण एकत्रित आले. त्याला ‘महाआघाडी’ असे संबोधले गेले. तर विधानसभा निवडणुकीतील घडामोडींनंतर विलासराव पाटील-उंडाळकर व डॉ. अतुल भोसले गट पुन्हा एकत्र आले. त्याला ‘मैत्रिपर्व’ म्हटलं गेलं. या साऱ्या घडामोडींमुळे गावागावांत दोन नव्हे तर तीन, चार, पाच असे गट तयार झाले आहेत. पण, प्रत्येक निवडणुकीत नेते वेगवेगळ्या नेत्यांच्या गळ्यात गळे घालत असतील तर ग्रामपंचायत निवडणुकीला आपण त्याचे अनुकरण केले तर बिघडले कुठे? असे म्हणत निवडणुकीसाठी नवी समीकरणे पाहायला मिळत आहेत. तालुक्यात सध्या ९३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकींसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे. ४ आॅगस्टला मतदान होणार आहे. तर ६ आॅगस्टला मतमोजणी होणार आहे. मनोमिलन, मैत्रिपर्व अन् आघाडीमुळे बहुतांशी गावात अपवाद वगळता दुरंगीच लढती होत आहेत. पाच गावांचा बिनविरोधचा ‘झेंडा’ खरंतर गावाची एकी गावाच्या विकासाला गती देऊ शकते; पण हे लक्षात कोण घेतो? पण, कऱ्हाड तालुक्यातील शेवाळेवाडी, भुयाचीवाडी, भरेवाडी, भोळेवाडी अन् पाचुंदच्या ग्रामस्थांना ते पटलंय म्हणून तर त्यांनी बिनविरोधचा झेंडा फडकविला आहे.