शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पारा वाढला पण; हुडहुडी जाता जाईना..१२ अंशावर तापमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 18:24 IST

Winter Session Maharashtra Satara- सातारा जिल्ह्यातील किमान तापमान वाढू लागले असून साताऱ्यात १२.०५ अंशाची नोंद झाली. पण, अजूनही हवेत गारठा व थंडगार वाऱ्याची लहर असल्याने जिल्हावासीयांची हुडहुडी जाता जाईना अशी स्थिती आहे.

ठळक मुद्देपारा वाढला पण; हुडहुडी जाता जाईना१२ अंशावर तापमान : वातावरणात गारठा कायम

सातारा : जिल्ह्यातील किमान तापमान वाढू लागले असून साताऱ्यात १२.०५ अंशाची नोंद झाली. पण, अजूनही हवेत गारठा व थंडगार वाऱ्याची लहर असल्याने जिल्हावासीयांची हुडहुडी जाता जाईना अशी स्थिती आहे.जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून थंडी सुरू आहे. मात्र, या थंडीत सतत चढ-उतार सुरू आहे. कधी किमान तापमान १२ अंशापर्यंत खाली येत आहे. तर काहीवेळा ढगाळ वातावरणामुळे तापमान २० अंशांवरही जात आहे. मात्र, मागील चार दिवसांपासून किमान तापमानात सतत उतार आला. त्यामुळे जिल्ह्यातील थंडीत मोठी वाढ झाली. तीन दिवसांपूर्वी तर साताऱ्यातील पारा ९ अंशावर आला होता. दोन वर्षांतील हे नीच्चांकी तापमान ठरले होते.जिल्ह्यातील महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण. या ठिकाणीही या वर्षातील नीच्चांकी तापमानाची नोंद मंगळवारी झाली. ११.०३ अंश तापमान नोंदले गेले. सध्या साताऱ्यासह महाबळेश्वरच्या किमान तापमानात वाढ होत चालली आहे. साताऱ्यात बुधवारी १०.०१ तर गुरुवारी १२.०५ अंश तापमानाची नोंद झाली. मात्र, हवेत गारठा कायम आहे. त्यातच थंड वाऱ्याची झुळूक येत असल्याने रात्रीपासून सकाळपर्यंत हुडहुडी भरून राहत आहे.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानSatara areaसातारा परिसर