शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

महाबळेश्वरमध्ये पारा घसरला, पर्यटक लुटतायत थंडीचा आनंद

By नितीन काळेल | Updated: December 20, 2023 16:54 IST

सातारा : जागतिक पर्यटनस्थळ व थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या महाबळेश्वरचा पारा गेल्या काही दिवसांपासून १३ अंशादरम्यान आहे. यामुळे गारठा ...

सातारा : जागतिक पर्यटनस्थळ व थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या महाबळेश्वरचा पारा गेल्या काही दिवसांपासून १३ अंशादरम्यान आहे. यामुळे गारठा कायम आहे. तरीही या वातावरणाचा आनंद पर्यटक लुटत असल्याचे चित्र दिसत आहे.जिल्ह्यात दरवर्षी नोव्हेंबर महिन्यापासून थंडीला सुरूवात होते. पण, यंदा नोव्हेंबरमध्ये थंडी जाणवलीच नाही. मात्र, डिसेंबरच्या मध्यावर थंडीची तीव्रता वाढत गेली. त्यामुळे प्रथमच पारा १५ अंशाच्या खाली आला. सातारा शहराचे किमान तापमानही १३.२ अंशपर्यंत उतरले होते. हे तापमान या वर्षातील नीच्चांकी ठरले. यामुळे थंडीत वाढ झाली. पण, दोन दिवसानंतर साताऱ्याचा पारा पुन्हा १८ अंशावर पोहोचला. यामुळे थंडी कमी झाली. तरीही ढगाळ हवामान तयार होत असल्याने आणि हवेतही थंड लहर आहे. या कारणाने बोचरी थंडी जाणवत आहे. तर महाबळेश्वरचा पारा अजून १५ अंशाच्या खालीच आहे. बुधवारी १२.९ अंश किमान तापमानाची नोंद झाली. त्यातच गेल्या काही दिवसांपासून महाबळेश्वरचा पारा सतत १३ अंशादरम्यान राहत असल्याने गारठा कायम जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांनाही ऊबदार कपडे घालूनच बाहेर पडावे लागत आहे. तर या थंडीचा आनंद पर्यटक घेत आहेत. सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास पर्यटक फिरण्यासाठी बाहेर पडत आहेत.महाबळेश्वरचे किमान तापमान असे..दि. १० डिसेंबर १४.७, ११ डिसेंबर १५, १२ डिसेंबर १५.५, १३ डिसेंबर १४.४, १४ डिसेंबर १३.५, दि. १५ डिसेंबर १२.५, १६ डिसेंबर १३.३, १७ डिसेंबर १३.५, १८ डिसेंबर १३.५,१९ डिसेंबर १२.६ आणि २० डिसेंबर १२.९

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानweatherहवामान