शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

मायणीच्या देशमुखांना अटक

By admin | Updated: March 8, 2017 23:16 IST

औरंगाबादमध्ये सात दिवसांची पोलिस कोठडी; एमबीबीएस प्रवेशासाठी ३३ लाखास गंडविल्याचा गुन्हा; एजंटही गजाआड

औरंगाबाद : सातारा जिल्ह्यातील मायणीच्या खासगी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस प्रथम वर्षाला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून पिता-पुत्रांची तब्बल ३३ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मायणी येथील संस्थाचालक महादेव रामचंद्र ऊर्फ एम्. आर. देशमुख (वय ५८, रा. मायणी, ता. खटाव, जि. सातारा) आणि एजंट विजय शिवराम नलावडे (रा. केशवनगर, चिंचवड, पुणे) यांना औरंगाबाद पोलिसांनी अटक केली. या दोघांनाही सात दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी सांगितले की, या प्रकरणातील आणखी एक आरोपी डॉ. प्रशांत एन. रानडे (रा. मुंबई) हा पसार आहे. सिडको एन-९, एम-२ येथील सचदेव पवार (नाव बदलले) हे व्यवसायाने शेतकरी आहेत. त्यांचा मुलगा सुरेश (नाव बदलले) यास डॉक्टर व्हायचे आहे. गतवर्षी त्यांनी एनईईटी (नीट) ही प्रवेशपूर्व परीक्षा दिली होती. या परीक्षा फॉर्मवर विद्यार्थ्याचे नाव आणि फोन नंबर, पत्ता असतो. याआधारे आरोपी नलावडे याने गतवर्षी १ एप्रिल २०१६ रोजी संपर्क साधून त्यांचे मेडिकल कॉलेज असल्याचे आणि तुमच्या मुलास एमबीबीएस प्रवेश मिळून देतो, असे तक्रारदारास सांगितले. याशिवाय आरोपीने त्यांना छत्तीसगड राज्यात बोलावून घेतले. तेथील एका मेडिकल कॉलेजच्या अध्यक्षांच्या खुर्चीवर बसून त्याने तोच या कॉलेजचा मालक असल्याचे सांगितलेएवढेच नव्हे तर त्याने तेथे पवार यांच्या मुलास एमबीबीएस प्रथम वर्षात प्रवेश देत असल्याचे सांगून त्यांच्याकडून डोनेशन आणि फीसच्या नावाखाली तब्बल २१ लाख २० हजार रुपये घेतले. त्या कॉलेजच्या प्रवेश यादीत तक्रारदाराच्या मुलाचे नाव नसल्याचे समजल्यानंतर त्यांनी नलावडेशी संपर्क साधला असता त्याने अखिल भारतीय स्तरावरील मेरिट वाढल्याने तुमच्या मुलाचे अ‍ॅडमिशन रद्द झाल्याचे कळविले. त्यानंतर त्याने मायणी येथे त्याचे दुसरे मेडिकल कॉलेज असून, तेथे आरोपी देशमुख यास भेटण्याचे सांगितले. आरोपीच्या सांगण्यानुसार तक्रारदार मायणी येथील मेडिकल कॉलेजमध्ये आरोपी देशमुख यास भेटले. तेथे देशमुख यानेही त्यांना तक्रारदाराच्या मुलास प्रवेश देण्याची ग्वाही देऊन प्रवेश प्रक्रियेसाठी ६ लाख ८७ हजार रुपये डी. डी. स्वरुपात आणि १५ लाख ४८ हजार रुपये आरटीजीएस पद्धतीने स्वीकारले. यावेळी आरोपींनी विश्वास बसावा म्हणून तक्रारदारास धनादेश दिले होते. तेथेही पवार यांच्या मुलास प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी आरोपींकडे पैशांची मागणी केली. जिवे मारण्याच्या धमक्याआरोपींनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच त्यांनी आरोपींकडे पैशांसाठी तगादा लावला असता काही रक्कम त्यांनी दिली. त्यांच्याकडे अद्यापही ३३ लाख ३० हजार रुपये आहेत. या रकमेची मागणी केल्यानंतर आरोपींनी त्यांच्या मुलाला उचलून नेईन, अशी धमकी दिली. या धमकीने घाबरलेल्या तक्रारदाराने शेवटी पोलिस आयुक्तांकडे धाव घेऊन या प्रकाराची माहिती दिली. सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून गुन्हे शाखेकडे तपास सोपविला.नीट परीक्षेतही करायचे सेटिंग?आरोपी हे नीट परीक्षेत विद्यार्थ्यांना उत्तम गुण मिळवून त्यांचा मेडिकल प्रवेश निश्चित करण्यासाठी देशात रॅकेट कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. हे रॅकेट लाखो रुपये घेऊन नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा सेंटरपर्यंत ते सेटिंग करतात. परीक्षेत उत्तम गुण मिळण्यासाठी त्या सेंटरमधील तज्ज्ञांच्या माध्यमातून परीक्षेची उत्तरे अचूक नोंदविण्यासाठी हे रॅकेट काम करते. परिणामी निकालात अपेक्षित गुण प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा प्रवेश सुकर होतो. हा प्रकार ऐकून पोलिस थक्क झाले. उपोषणाचा ४७ वा दिवस!मायणीतील आयएमएसआर मेडिकल कॉलेजच्या २०१४-१५ बॅचमधील एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आल्याने संबंधितांचे गेल्या ४७ दिवसांपासून चक्री उपोषण सुरूच आहे. या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला गेला नसल्याने पुढील प्रवेश घेण्यासाठी या विद्यार्थ्यांना अडचणी आल्या आहेत. याबाबत विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार व विनंत्या करूनही त्यांची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी चक्री उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.