धामणेर : ‘खेड्यांच्या विकासासोबतच स्वच्छतेलासुद्धा प्राधान्य देऊन भारत फोर्स कंपनी, पुणे यांच्या माध्यमातून कोरोनासारख्या महामारीला सामोरे जाण्यासाठी गावांमध्ये सक्षमता यावी म्हणून संपूर्ण वैद्यकीय सुविधाही पुरविण्यात आल्या आहेत,’ असे प्रतिपादन भारत फोर्ज कंपनी पुणेच्या सीएसआर फंडाच्या प्रमुख डॉ. लीना देशपांडे यांनी केले. नागझरी येथे चोवीस गावांतील बंदिस्त गटर्स कामांच्या शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी राज्य लेखा समितीचे अध्यक्ष शहाजी क्षीरसागर, कंपनीचे अधिकारी जयदीप लाड, सरपंच जितेंद्र भोसले, संजय शिंदे, नाथा कदम, अजित खताळ, शिल्पा ढोले आदी उपस्थित होते. शहाजी क्षीरसागर म्हणाले, ‘सर्व गावांमधून कंपनीच्या माध्यमातून विकासकामे वेगाने सुरू आहेत. गावातील लोक राजकीय मतभेद विसरून कंपनीच्या विकासकामांमध्ये सक्रिय झाले आहेत ही बाब विकासाच्या दृष्टीने चांगली आहे.’
या वेळी जायगाव, कण्हेरखेड, वेळू, तारगावचे ग्रामस्थ उपस्थित होते. (वा.प्र.)
फोटो १६धामनेर
नागझरी ता. कोरेगाव येथे बंदिस्त गटर्स कामांचे उद्घाटन डॉ. लीना देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शहाजी क्षीरसागर, जयदीप लाड उपस्थित होते.