शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

ठरलं! सातारच्या मेडिकल कॉलेजला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव

By दीपक देशमुख | Updated: August 9, 2023 17:51 IST

सातारा : सातारा शहरात राज्यातील आदर्शवत असे मेडिकल कॉलेज आणि ५०० खाटांचे रुग्णालय होत आहे. जिल्ह्यातील हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ...

सातारा : सातारा शहरात राज्यातील आदर्शवत असे मेडिकल कॉलेज आणि ५०० खाटांचे रुग्णालय होत आहे. जिल्ह्यातील हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून त्याचे नावही तेवढेच बुलंद असावे, अशी अपेक्षा होती. त्यावरून बराच ऊहापोह झाला. अखेर राज्य शासनाने या कॉलेजचे नामकरण 'छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीयमहाविद्यालय व रुग्णालय, सातारा' असे करण्याचा निर्णय बुधवारी घेतला. या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.सातारा मेडिकल काॅलेज २०१४ मध्ये मंजूर झाले होते. तथापि, मेडिकल कौन्सिलच्या आणि इतर संस्थांच्या निकषांची पूर्तता करण्यात तसेच जागा उपलब्ध करून घेण्याबाबत बराच कालावधी लोटल्यावर गतवर्षी कॉलेजच्या पहिल्या वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. या काॅलेजला स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि युगपुरुष ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांचे सुपुत्र असलेल्या ‘छत्रपती संभाजी महाराज’ यांचे नाव देण्याची विनंती खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्य शासनास एक वर्षापूर्वी केली होती. तसेच, नुकत्याच देवेंद्र फडणवीस यांच्या कऱ्हाड दौऱ्यातही याबाबत स्वतंत्र प्रस्ताव दिला होता.त्यानुसार राज्य शासनाने दि. ९ ऑगस्टला मेडिकल कॉलेजचे नामकरण 'छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीयमहाविद्यालय व रुग्णालय, सातारा' करण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने पुढील कार्यवाही करावी, असा आदेशही दिला आहे.

राज्य शासनाच्या या निर्णयामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या धगधगत्या कार्यकर्तृत्वाची प्रेरणा सर्वांनाच अखंड मिळत राहणार आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्रिमंडळाचे जनतेच्या वतीने आणि व्यक्तीश: अभिनंदन करतो. -उदयनराजे भोसले, खासदार

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMedicalवैद्यकीयcollegeमहाविद्यालयhospitalहॉस्पिटल